मुख्याध्यापक गोरक्षनाथ दातीर यांचा सेवापुर्ती गौरव सोहळा शेवगाव येथे संपन्न

मुख्याध्यापक गोरक्षनाथ दातीर यांचा सेवापुर्ती गौरव सोहळा शेवगाव येथे संपन्न

 

(सुनिल नजन “चिफब्युरो” स्पेशल क्राईम रिपोर्टर अहिल्यानगर जिल्हा) चेडेचांदगाव तालुका शेवगाव जिल्हा अहिल्यानगर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील मुख्याध्यापक गोरक्षनाथ बालचंद दातीर यांचा ३५ वर्षाच्या प्रदीर्घ सेवेनंतर सेवापुर्ती गौरव सोहळा शेवगाव येथील सप्तपदी मंगल कार्यालयात मोठ्या उत्साहात संपन्न झाला.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी चापडगावच्या संत तुकाराम महाराज संस्थानचे प्रमुख ह.भ.प.मारुती महाराज झिरपे हे होते.तर प्रमुख पाहुणे म्हणून ह.भ.प. बाळकृष्ण महाराज सुडके,ह.भ.प. बाबासाहेब महाराज मतकर, ज्ञानेश्वर साखर कारखान्याचे माजी संचालक निव्रुती पाटील दातीर,माळेगावच्या जनशक्ती उद्योग समूहाचे अध्यक्ष जगन्नाथ पाटील गावडे हे होते.प्रारंभी दीप प्रज्वलन करुन या सोहळ्याची सुरुवात करण्यात आली.मुख्याध्यापक गोरक्षनाथ दातीर आणि त्यांच्या सौभाग्यवती आशाताई दातीर यांचा ३५ वर्षे सेवापुर्ती गौरव सोहळ्या निमित्त सपत्नीक सत्कार करण्यात आला. शेवगावच्या शिक्षण विभागाच्या विस्तार अधिकारी शैलजा राऊळ मॅडम,दुसरे विस्तार अधिकारी शंकर गाडेकर, कोपरगावचे माजी गटशिक्षण अधिकारी महादेव काठमोरे साहेब,लाड जळगावचे सरपंच अंबादास ढाकणे,चेडेचांदगावचे सरपंच रमेश माने,माजी सरपंच सुभाष कनसे, प्राथमिक शिक्षक बॅंकेचे व्हाईस चेरमन रमेश गोरे, विकास मंडळाचे विश्वस्त दत्तू फुंदे सर, आदर्श गाव वडुलेचे सरपंच दिनकराव गर्जे,चिलेखनवाडीचे सरपंच भाऊसाहेब सावंत, जनशक्ती उद्योग समूहाचे प्रमुख आणि धनगर समाजाचे नेते जगन्नाथ पाटील गावडे, ज्ञानेश्वर साखर कारखान्याचे माजी संचालक निव्रुती पाटील दातीर,ह.भ.प. बाबासाहेब महाराज मतकर यांनी मुख्याध्यापक गोरक्षनाथ दातीरसर यांच्या कार्याविषयी गौरवोद्गार काढले. एका व्यक्तीने मुख्याध्यापक गोरक्षनाथ दातीर यांचे वडील बालचंद दातीर हे माजी केंद्रीय उर्जा मंत्री नामदार बबनराव ढाकणे यांच्या कडे ऊसतोडणी कामगार म्हणून काम करत होते.अतिशय प्रतिकूल परिस्थितीत मुख्याध्यापक गोरक्षनाथ दातीर सर यांनी शिक्षण घेऊन शिक्षकाची नोकरी पत्करली.दातीर सर यांच्या सेवापुर्ती गौरव सोहळ्यासाठी पाथर्डीच्या श्रीतीलोक जैन विद्यालयाचे प्राचार्य खाबिया सर, माजी शिक्षक बी.आर.उरणकर सर, सुमनताई ढाकणे अध्यापक विद्यालयाचे प्राचार्य अण्णासाहेब पालवे सर, बोधेगाव येथील आबासाहेब काकडे महाविद्यालयांचे उपप्राचार्य डॉ भागवत राशिनकर सर, अमरापूरच्या उच्च माध्यमिक विद्यालयाचे मा.प्राचार्य जयराम सुडके सर,बप्पासाहेब कदम, रामकिसन कदम,शारदाताई टेकाडे, जालिंदर टेकम, बाबासाहेब मते, मंदाताई निमसे, अरूण कर्डिले, संभाजी काकडे, नारायण खेडकर,भिमराज देशमुख, महादेव शिंदे, नामदेव धायतडक, सखाराम सातपुते, सुखदेव शिंदे, अशोक घुमरे, बप्पासाहेब घुमरे, सुनिल जाधव, लक्ष्मण नरोटे, बाबासाहेब तांबे, कल्याण पोटभरे, गोविंद दातीर, सुरेश दातीर, वाघोली सेवा सोसायटीचे संचालक पांडुरंग दातीर, भानुदास भिसे गुरूजी,सौ.जाईबाई भिसे, छगन पानसरे,भिमाबाई भिसे, आत्माराम घनवट, सविता चौधरी, रमेश खरात, कल्याण पोटभरे, अण्णासाहेब दातीर, भाऊसाहेब पालवे, बाजीराव दातीर सर, काकासाहेब जर्हाड, दादासाहेब गरगडे, पांडुरंग कनसे, घनःश्याम गरगडे, भाऊसाहेब नजन, शिवाजी जमधडे, सुमनताई जमधडे, सुनिल पायमोडे, तानाजी भालेराव, सुखदेव शिंदे यांच्या सह संपूर्ण अहिल्यानगर जिल्ह्यातील अनेक गावांतील शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष, सरपंच, उपसरपंच, चेअरमन, व्हाईस चेअरमन, सर्व सदस्य व ग्रामस्थ,सर्व केंद्र प्रमुख, विषयतज्ञ, पदाधिकारी, शिक्षक संघटना, सर्व प्राथमिक, माध्यमिक, शिक्षकवृंद हे आवर्जून उपस्थित होते.सुत्रसंचालन संजय पुंडे,तर आभार विशाल दातीर यांनी मानले.प्रिती भोजनाने या सोहळ्याची सांगता झाली.