Home पाचोरा तालुका गोपीचंद पुना पाटील,विद्यालय,कोळगावचे दहावीच्या परिक्षेत घवघवीत यश….!!!!

गोपीचंद पुना पाटील,विद्यालय,कोळगावचे दहावीच्या परिक्षेत घवघवीत यश….!!!!

गोपीचंद पुना पाटील,विद्यालय,कोळगावचे दहावीच्या परिक्षेत घवघवीत यश….!!!!

 

कोळगाव (भडगाव)- कर्मवीर तात्यासाहेब हरि रावजी पाटील,किसान शिक्षण संस्था,भडगाव,संचलीत गोपीचंद पुना पाटील,विद्यालय,कोळगावचा फेब्रुवारी/मार्च २०२५/२६ मध्ये बोर्डाच्या वतीने घेण्यात आलेल्या इयत्ता दहावीच्या परिक्षेत विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळवत विद्यालयाचा निकाल ९३:०७% लागला आहे.

फेब्रुवारी/मार्च २०२५/२६ मध्ये नाशिक मंडळातर्फे घेण्यात आलेल्या परिक्षेत महाविद्यालयाचे एकूण १३० विद्यार्थी-विद्यार्थिनी परिक्षेसाठी प्रविष्ठ झाले होते,पैकी १२१ विद्यार्थी-विद्यार्थिनींनी उत्तम गुण प्राप्त करत यश संपादन केले आहे.

 

*_विद्यालयातील प्रथम पाच गुणवंत विद्यार्थी….!!!!_*

 

१) मयुरेश दिनेश पाटील (९६:००%)

 

२)समृद्धी चेतन भोसले (९५:००%)

 

३)चेतना अमृत महाजन (९२:४०%)

 

४) श्रद्धा धर्मराज पाटील (९१:६०)

 

५) चेतना प्रकाश महाजन (९०:००)

 

विद्यालयाच्या या दैदिप्यमान कामगिरीबद्दल तसेच यशस्वी विद्यार्थ्यांच्या यशाबद्दल जळगाव जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक तसेच संस्थेचे चेअरमन आदरणीय नानासाहेब प्रतापराव पाटील,दुध फेडरेशनच्या संचालिका तथा संस्थेच्या उपाध्यक्षा ताईसाहेब डॉ.पुनम पाटील,मंत्रालयातील उपसचिव दादासाहेब प्रशांतराव पाटील,प्राचार्य आर आर वळखंडे,माजी प्राचार्य अनिल पवार,परीक्षा केंद्रप्रमुख आबासाहेब कोळगावकर,पर्यवेक्षिका सिमा शिसोदे,कनिष्ठ महाविद्यालयीन कार्यवाहक रघुनाथ पाटील आदिंनी आनंद व्यक्त करीत सर्व विद्यार्थी तथा त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे अभिनंदन करीत भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

Don`t copy text!