Home पाचोरा पाचोरा तालुका शिवसेना महिला आघाडीच्या वतीने निषेध आंदोलन; आरोपीस फाशीची शिक्षा देण्याची...

पाचोरा तालुका शिवसेना महिला आघाडीच्या वतीने निषेध आंदोलन; आरोपीस फाशीची शिक्षा देण्याची मागणी

पाचोरा तालुका शिवसेना महिला आघाडीच्या वतीने निषेध आंदोलन; आरोपीस फाशीची शिक्षा देण्याची मागणी

 

पाचोरा ता. ७ — पुणे जिल्ह्यातील नरसापूर येथे निष्पाप तीन वर्षीय चिमुरडीवर झालेल्या अमानुष अत्याचार व निर्घृण हत्येच्या घटनेने संपूर्ण राज्यात संतापाची लाट उसळली असून पाचोरा तालुक्यातूनही या घटनेचा तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला.
या क्रूर घटनेच्या निषेधार्थ पाचोरा तालुका शिवसेना महिला आघाडीच्या वतीने आंदोलन करण्यात आले. यावेळी आरोपीस तात्काळ अटक करून जलद गती न्यायालयात खटला चालवत फाशीची शिक्षा देण्यात यावी, अशी ठाम मागणी करण्यात आली.
आंदोलनादरम्यान पाचोरा उपविभागीय अधिकारी श्री. भूषण अहिरे, तहसीलदार श्री. विजय बनसोडे तसेच पोलीस निरीक्षक श्री. राहुल पवार यांना निवेदन देण्यात आले. या वेळी शिवसेना महिला आघाडीच्या जिल्हाप्रमुख सौ. ललिता पाटील, सौ. वंदनाताई पाटील, सौ. मंदाताई पाटील (उपजिल्हाप्रमुख), सौ. बेबाताई पाटील (उपजिल्हा समन्वयक), जयश्री येवले (उपजिल्हा संघटक), सौ. मंदाकिनी पारोचे (शहर प्रमुख), सौ. अनिता पाटील (शहर प्रमुख), नगरसेविका सौ. वर्षाताई ब्राह्मणे व नगरसेविका सौ. मनीषाताई बाविस्कर उपस्थित होत्या.
निवेदनात या अमानुष घटनेचा तीव्र निषेध नोंदवित आरोपीवर कठोरातील कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली. तसेच या प्रकरणाचा निष्पक्ष तपास करण्यासाठी स्वतंत्र विशेष तपास पथक नेमण्यात यावे व पीडित कुटुंबाला तातडीने न्याय मिळावा, अशी मागणीही करण्यात आली.

Don`t copy text!