१५ वर्षानंतर पुन्हा पाखरांची शाळा…!!!

🕊️ १५ वर्षानंतर पुन्हा पाखरांची शाळा!

 

इयत्ता दहावी २०१० च्या वर्गमित्र-मैत्रिणींचा स्नेहमेळावा पारध येथे उत्साहात

 

पारध (भोकरदन तालुका प्रतिनिधी –श्री महेंद्र बेराड सर):

“वर्ग तोच होता, बेंच तेच होते, सर आणि मॅडम ही तेच होते… फरक इतकाच की १५ वर्षांनंतर सर्व विद्यार्थी-विद्यार्थिनी पुन्हा एकत्र आले होते!” — अशी भावना जनता विद्यालय व महाविद्यालय, पारध (केळणा अजिंठा शिक्षण संस्था) येथील इयत्ता दहावी २०१० च्या बॅचच्या स्नेहमेळाव्यात व्यक्त होत होती.

 

हा मेळावा शाळेच्या दहावीच्या वर्गातच आनंदोत्सवात पार पडला. शाळेचा परिसर व वर्ग सुंदर सजावटीने सजविण्यात आला होता. कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली.

 

गुरुवर्यांना फुलांच्या वर्षावात स्वागत करून औक्षण करण्यात आले. त्यानंतर राष्ट्रगीत आणि प्रार्थनेने कार्यक्रमाचा शुभारंभ झाला.

मुख्याध्यापक सौ. शर्मिला शिंदे यांनी सर्व उपस्थितांचे स्वागत करून संयोजक म्हणून अध्यक्षस्थानी होत्या. सर्व शिक्षकांचा शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ आणि सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला.

 

कार्यक्रमात अक्षय लोखंडे, सागर देशमुख, सुमय्या पठाण, राजकन्या लोखंडे, मंगेश देशमुख, विकास लोखंडे, राहुल पायघन, विकास पायघन, मंगेश आंबेकर यांनी मनोगते व्यक्त केली.

अनिल हिंगे यांनी सुंदर गायन सादर केले तर मंगेश आंबेकर यांनी भावस्पर्शी कविता सादर केली. स्वाती लोखंडे यांनी शाळेतील आठवणींना उजाळा दिला.

 

गुरुवर्यांच्या वतीने प्रा. हिवाळे सर, प्रा. देशमुख सर, मुख्याध्यापक सौ. शिंदे मॅडम, पर्यवेक्षक महेंद्र लोखंडे सर, प्रा. संग्राम देशमुख सर, शिक्षक बकिमचंद्र लोखंडे सर यांनी मनोगते व्यक्त केली.

प्रा. हिवाळे सर म्हणाले, “गेट-टुगेदर रिसॉर्टवर करण्यापेक्षा आपल्या शाळेत करणे अनमोल आहे. शिक्षक आणि आईवडिलांचे आशीर्वाद पाठीशी असतील तर जीवनात काहीच कमी पडत नाही.”

 

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी राजकन्या लोखंडे, पूजा लोखंडे, शितल देशमुख, रेणुका तबडे, योगिता पाखरे, सीमा क्षीरसागर, शेख आईशा, सुमय्या पठाण, वर्षा सपकाळ, संगीता भालके, मीरा तबडे, सविता काकफळे, स्वाती मोकाशे, मंगेश देशमुख, विजय तबडे, रोहन श्रीवास्तव, विजय पांडे, अक्षय लोखंडे, मंगेश आंबेकर, विनोद जाधव, शेख सईद, शुभम श्रीवास्तव, आकाश बारवाल, शरद पायघन, राहुल पायघन, विकास पायघन, अरुण काटोले, अनिल हिंगे, प्रवीण आपार, सागर तेलंग्रे, सागर श्रीसागर, दीपक दांडगे, अनिल पवार, शेख इमरान, शेख रजाक, नदीम पठाण, अनिल अपार, भरत तबडे, दीपक बोर्डे, विनोद बोर्डे आदींनी परिश्रम घेतले.

 

कार्यक्रमाचे सुत्रसंचालन विकास लोखंडे यांनी केले, तर सागर देशमुख यांनी आभार मानले.