पाचोरा – येथील रोटरी क्लबचे अध्यक्ष डॉ. अमोल जाधव यांचे कडून माध्यमिक कन्या विद्यालयातील 30 विद्यार्थिनींना “स्पोर्ट शूज” भेट

पाचोरा – येथील रोटरी क्लबचे अध्यक्ष डॉ. अमोल जाधव यांचे कडून माध्यमिक कन्या विद्यालयातील 30 विद्यार्थिनींना “स्पोर्ट शूज” भेट देण्यात आले. रोटरी क्लबचे असिस्टंट डिस्ट्रिक्ट गव्हर्नर व ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते राजेश बाबूजी मोर यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक 1 एप्रिल 2023 रोजी माध्यमिक कन्या विद्यालयात हा कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला.

दिनांक 26 जानेवारी 2023 रोजी रोटरी क्लब पाचोरा भडगाव चे अध्यक्ष डॉ. अमोल जाधव यांच्या हस्ते कन्या विद्यालयात ध्वजवंदन करण्यात आले होते. या ध्वजवंदन प्रसंगी झालेल्या परेड मध्ये 30 विद्यार्थिनी सहभागी झाल्या होत्या. यापैकी अनेक विद्यार्थिनीकडे स्पोर्ट शूज नसल्याचे डॉक्टर अमोल जाधव यांच्या निदर्शनास आले होते. त्यावेळेस त्यांनी या संपूर्ण 30 विद्यार्थ्यांच्या समूहाला “स्पोर्ट शूज” देण्याचे जाहीर केले होते. त्या अनुषंगाने हा कार्यक्रम घेण्यात आला.

या कार्यक्रम प्रसंगी कन्या विद्यालयाचे प्राचार्य संजय पवार, पर्यवेक्षक सुवर्णसिंग राजपूत सर, रोटरी क्लबचे सेक्रेटरी डॉ. गोरखनाथ महाजन, रोटेरियन निलेश कोटेचा, रोटेरियन रावसाहेब पाटील, कन्या विद्यालयाचे ज्येष्ठ शिक्षक आर. के. माळी, उज्वला महाजन, कुंदा पाटील, जयदीप पाटील, प्रा. रवींद्र चव्हाण, प्रतिभा परदेशी, प्रा.अंकिता शेळके, अंबालाल पवार, पी.जी. चौधरी, सुभाष जाधव, अनिल पवार, आदी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. प्रा. शिवाजी शिंदे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रकटन केले.