महाशिवरात्रीच्या अखंड हरिनाम सोहळ्याची वडुले खुर्द येथे सांगता
(सुनिल नजन “चिफब्युरो” स्पेशल क्राईम रिपोर्टर अहिल्यानगर जिल्हा)
देवांचे देव महादेव यांच्या ध्यान धारणेतून निर्माण झालेल्या महाशिवरात्री निमित्त त्रिदिनी अखंड हरिनाम सोहळ्याची सांगता वडुले खुर्द येथील आव्हाड वस्ती येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाली.
तारकेश्वर गडावर निवासी असलेले संजय महाराज वारे यांच्या काल्याच्या किर्तनाने उपस्थित श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले. ह.भ.प.सुर्यभान महाराज केसभट व केशव महाराज गुजर यांची प्रवचने झाली.तर नागताळ्याचे महंत काशिनाथ महाराज आणि भगवान गडाचे निवासी माउली महाराज शास्त्री यांचे किर्तने झाली.माजी जिल्हा परिषद सदस्या आणि शिवसेनेच्या नेत्या सौ हर्षदाताई काकडे आणि वंचित बहुजन आघाडीचे राज्य प्रवक्ते प्राध्यापक किसनराव चव्हाण यांनी या सोहळ्यासाठी हजेरी लावल्याने राजकीय निरीक्षकांच्या भुवया उंचावल्या आहेत. या सोहळ्यासाठी भिष्माचार्य महादेव महाराज आव्हाड, नवनाथ महाराज आव्हाड, गणेश महाराज रणमले,मार्तंड महाराज तोगे, जगन्नाथ खेडकर, अजिनाथ आव्हाड, भानुदास रणमले, जालिंदर आव्हाड, संतोष महाराज मिसाळ, निवृत्ती आव्हाड, बबन गोसावी,बबन माळी,शेषराव आव्हाड सर, यांच्या सह पंचक्रोशीतील भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.























