शेवगाव-पाथर्डी विधानसभा मतदारसंघाच्या भाजपच्या हॅट्ट्रिक आमदार मोनिकाताई राजळे यांच्या वतीने नेवाशाचे आमदार विठ्ठलराव लंघे यांचा सन्मान सोहळा संपन्न
(सुनिल नजन “चिफब्युरो”स्पेशल क्राईम रिपोर्टर अहिल्यानगर जिल्हा) अहिल्यानगर जिल्ह्यातील शेवगाव -पाथर्डी विधानसभा मतदारसंघाच्या भाजपच्या हॅट्ट्रिक आमदार मोनिकाताई राजळे यांच्या वतीने नेवाशाचे शिवसेनेचे शिंदे गटाचे आमदार विठ्ठलराव लंघे यांचा वाढदिवसाच्या निमित्ताने काठी आणि घोंगडे देउन सन्मान करण्यात आला. शेवगाव तालुक्यातील लोळेगाव येथील बिरोबाभक्त बाबाजी महाराज बनसुडे यांनी आमदार मोनिकाताई राजळे यांच्या अनुपस्थितीत हा सन्मान सोहळा साजरा केला.आमदार मोनिकाताई राजळें या महाराष्ट्र विधानसभेच्या पावसाळी अधिवेशना निमित्ताने मुंबई येथे असल्याने त्या आमदार विठ्ठलराव लंघे यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्यास येण्याची इच्छा असुनही उपस्थित राहु शकल्या नाहीत.परंतू त्यांच्या वतीने हा सन्मान करण्यात आला.यावेळी आमदार विठ्ठलराव लंघे यांचे नेवासा तालुक्यातील अनेक जुने नवे मित्र उपस्थित होते.संभाजीनगरचे शिवसेनेचे खासदार संदिपान भुमरे पाटील, आणि अहिल्यानगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाचे भाजपचे माजी खासदार सुजयदादा विखे पाटील हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. कम्युनिस्ट नेते स्वर्गीय वकिलराव लंघे पाटील यांच्या नंतर ४२ वर्षांनी त्यांचे सुपुत्र विठ्ठलराव लंघे यांच्या रूपाने गावाला आमदारकी मिळाल्याने शिरसगावातील ग्रामस्थांतर्फे या अभिष्टचिंतन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. नेवासा तालुक्याचे राष्ट्रवादीचे माजी आमदार पांडुरंग अभंग,अब्दुलभाई शेख,अशोक कोळेकर, शशिकांत मतकर, तेजश्री लंघे,अंकुश काळे, सुनिल मोरे, महेश गायकवाड, किसनराव गडाख, सिद्धार्थ नवले, बबनराव पिसोटे, सुरेश भिटे, ऋषिकेश शेटे, सुनिल लंघे, राजेंद्र औटी, बाळासाहेब पवार, श्रीकांत नवले, अशोक मिसाळ, कपिल पवार,सचिन देसरडा, काशिनाथ नवले, प्रभाकर शिंदे, नवनाथ साळुंके, दादा होन हे यावेळी आवर्जून उपस्थित होते.या अभिष्टचिंतन सोहळ्यासाठी नेवासा तालुक्यातील अनेक मान्यवरांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती.आजी माजी खासदारांनी आमदार लंघे यांची तोंडभरून स्तुती करताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कडे शिवसेनेच्या कोट्यातून लंघे यांच्या मंत्री पदासाठी आग्रह धरू अशी ग्वाही दिली.