Home महाराष्ट्र राहुरी- पाथर्डी विधानसभा पोट निवडणूक शांततेत पार पाडण्यासाठी पाथर्डी पोलिसांकडून मिरी,तिसगाव, करंजी...

राहुरी- पाथर्डी विधानसभा पोट निवडणूक शांततेत पार पाडण्यासाठी पाथर्डी पोलिसांकडून मिरी,तिसगाव, करंजी भागात रूट मार्च

२२३ राहुरी- पाथर्डी विधानसभा पोट निवडणूक शांततेत पार पाडण्यासाठी पाथर्डी पोलिसांकडून मिरी,तिसगाव, करंजी भागात रूट मार्च

 

 

(सुनिल नजन “चिफब्युरो” स्पेशल क्राईम रिपोर्टर अहिल्यानगर जिल्हा)

२२३ राहुरी- पाथर्डी विधानसभा मतदार संघात दिनांक २३ एप्रिल रोजी होणारी पोट निवडणुक शांततेत पार पाडण्यासाठी हा रुट मार्च संपन्न झाला.पाथर्डी तालुक्यात दिनांक 19.04.2026 रोजी पाथर्डी पोलीस स्टेशनच्या हद्दीत सकाळी 08.45 ते 09.20 या वेळेत तिसगाव येथे, सकाळी 10 ते 10.25 वाजण्याच्या सुमारास आणि करंजी येथे 10.40 ते 11.00 वाजण्याच्या दरम्यान हे पोलिस संचलन घेण्यात आले.आगामी होणाऱ्या 223 राहुरी विधानसभा पोट निवडणूक 2026 अनुषंगाने अहिल्या नगर जिल्हा पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे साहेब,अप्पर पोलीस अधीक्षक वैभव कलबुर्मे साहेब, शेवगाव विभागाचे उपविभागीय पोलिस अधिकारी निरज राजगुरू साहेब यांच्या मार्गदर्शना खाली हा रूट मार्च घेण्यात आला होता . सदर रूट मार्च करिता जे अधिकारी स्वतः हजर होते ते पुढील प्रमाणे CISF चे ASI B.C. भिल साहेब, 25 जवान व CRPF चे SI प्रवीण कुमार साहेब व 15 जवान,पाथर्डी पोलीस स्टेशन चे 5 अधिकारी 20 पोलीस अंमलदार व 15 होमगार्ड हजर होते. पाथर्डी पोलीस स्टेशनच्या हद्दीत मिरी,तिसगाव, करंजी येथील रस्त्यावर हा रूट मार्ग कार्यक्रम घेण्यात आला आहे. ही गावे अतिशय अती संवेदनशील म्हणून गणली जातात.तेथे कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी अतिशय उपयुक्त म्हणून हा कार्यक्रम संपन्न झाला अशी माहिती पाथर्डी पोलिस स्टेशनचे कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक विलास पुजारी साहेब यांनी दिली.

Don`t copy text!