माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेत विद्यार्थिनिंनी मारली बाजी
सोयगाव / प्रतिनिधी दत्तात्रय काटोले
फेब्रुवारी/मार्च २०२६ मध्ये घेण्यात आलेल्या १०वी च्मा माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेत कै. बाबूरावजी काळे मराठी स्कुलचे २४ पैकी २२ विद्यार्थी अतिशय चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाले. २२ विद्यार्थ्यांना ८० टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळाले आहेत. गेल्या तीन वर्षांपासून शाळेचा निकाल १०० टक्के असून यंदाही १६ टक्के निकालाची परंपरा कायम राखली गेली आहे.
कु. मृणाल गणेश मानकर ही ९९.४०% गुण मिळवून प्रथम, कु. जिज्ञा राजू दुतोंडे ९९.२०% गुण मिळवून द्वितीय आणि कु. प्रतिक्षा विजय पगारे ही ८८.६०% गुण मिळवून तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण झाली आहे.
शाळेच्या या यशाबद्दल शिवज्योती शिक्षण प्रसारक मंडळाच्या अध्यक्षा ज्योतीताई काळे, प्राचार्य डॉ. राजेश यादव, मुख्याध्यापक नितेश पाटील, उपमुख्याध्यापक ज्ञानेश्वर एलिस, पर्यवेक्षक सागर घाटे, तसेच शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

























