Home जळगाव चोपडा येथील दादासाहेब डॉ. सुरेश जी. पाटील महाविद्यालयात आयोजित चार दिवसीय “संस्मित...

चोपडा येथील दादासाहेब डॉ. सुरेश जी. पाटील महाविद्यालयात आयोजित चार दिवसीय “संस्मित महोत्सव-२०२६” चे उदघाटन उत्साहात संपन्न

चोपडा येथील दादासाहेब डॉ. सुरेश जी. पाटील महाविद्यालयात आयोजित चार दिवसीय “संस्मित महोत्सव-२०२६” चे उदघाटन उत्साहात संपन्न

 

 

 

चोपडा: येथील महात्मा गांधी शिक्षण मंडळाचे दादासाहेब डॉ. सुरेश जी. पाटील महाविद्यालयातील  व्यवस्थापन विभागातर्फे आयोजित चार दिवसीय “संस्मित महोत्सव २०२६” या कार्यक्रमाचा उदघाटन समारंभ उत्साहात पार पडला.

या कार्यक्रमाप्रसंगी महात्मा गांधी शिक्षण मंडळाच्या सचिव डॉ. सौ. स्मिताताई संदीप पाटील यांच्या हस्ते “संस्मित महोत्सव २०२६” चे फलक अनावरण करून कार्यक्रमाचे उदघाटन करण्यात आले. याप्रसंगी उपस्थित मान्यवरांचा विभागाच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन यथोचित सत्कार करण्यात आला.

या उदघाटन प्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. डॉ .के. एन. सोनवणे , उपप्राचार्य  प्रा. डॉ .आर. एम. बागुल , उपप्राचार्य प्रा. डॉ.ए. बी. सूर्यवंशी, महाविद्यालयाचे समन्वयक  डॉ. शैलेशकुमार वाघ , प्रबंधक डी. एम. पाटील ,  व्यवस्थापन विभाग प्रमुख डॉ. अभिजीत साळुंखे तसेच विभागातील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या महोत्सवाच्या पुढील चार दिवस “संस्मित महोत्सव २०२६” अंतर्गत विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव मिळावा या हेतूने विविध प्रकारच्या सांस्कृतिक व समाजोपयोगी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.  दिनांक १३ मार्च २०२६ रोजी महाविद्यालयात “महारक्तदान शिबिराचे” आयोजन करण्यात आले असून सदर शिबिरात आपली सामाजिक बांधिलकी लक्षात घेऊन मोठ्या संख्येने सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांनी रक्तदान करावे, असे प्राचार्य , उपप्राचार्य, समन्वयक महोदयांच्या वतीने आवाहन करण्यात आले.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विभागातील विद्यार्थी चि. हर्षल संजय पाटील याने केले.

या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी व्यवस्थापन विभागप्रमुख डॉ. अभिजित साळुंखे, कार्यक्रमाचे समन्वयक सौ. आर. पी. जैस्वाल,  निलेश पाटील, सौ. मोहिनी सोनवणे तसेच विभागातील सर्व शिक्षक शिक्षकेतर बंधू-भगिनी व विद्यार्थ्यांचे सहकार्य लाभले.

Don`t copy text!