महिला बचत गटातील महिलांसाठी सायबर जनजागृती अभियान
कुर्हे पानाचे, ता. भुसावळ येथे QHF Impact Activity उत्साहात संपन्न
भुसावळ प्रतिनिधी : कुर्हे पानाचे, ता. भुसावळ येथे आज, दि. २७ ऑगस्ट २०२६ रोजी महिला बचत गटातील महिलांसाठी सायबर जनजागृती व सुरक्षित डिजिटल व्यवहाराबाबत Impact Activity घेण्यात आली.
या उपक्रमामध्ये महिलांना सायबर फसवणुकीचे विविध प्रकार, OTP, PIN, CVV, UPI PIN कोणासोबतही शेअर न करणे, बनावट फोन कॉल व लिंकपासून सावध राहणे, ऑनलाइन आर्थिक व्यवहार करताना घ्यावयाची काळजी याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. तसेच सायबर गुन्हा घडल्यास तातडीने योग्य पद्धतीने तक्रार करण्याचे आवाहन करण्यात आले.
या जनजागृती उपक्रमाला महिला बचत गटातील महिलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. महिलांनी सायबर फसवणुकीशी संबंधित प्रश्न विचारून आपल्या शंकांचे निरसन करून घेतले.
हा उपक्रम Quick Heal Foundation (QHF) च्या Impact Activity अंतर्गत घेण्यात आला. या उपक्रमासाठी KBCNMU, जळगावच्या QHF Warriors – तनिषा महाजन व तेजस्विनी पाटील यांनी मार्गदर्शन केले.
महिलांमध्ये डिजिटल सुरक्षिततेबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी हा उपक्रम उपयुक्त ठरला.
















