दादासाहेब डॉ. सुरेशजी पाटील महाविद्यालयात ‘राष्ट्रीय विज्ञान दिन’ उत्साहात संपन्न ( दक्षिण कोरिया येथील शास्त्रज्ञ डॉ. भावना जोशी यांचे ऑनलाइन मार्गदर्शन )
चोपडा: येथील दादासाहेब डॉ. सुरेश जी. पाटील महाविद्यालयात भौतिकशास्त्र विभागातर्फे दि.२८ फेब्रुवारी २०२६ रोजी ‘राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त’ दक्षिण कोरिया येथील वूसुक विद्यापीठातील डॉ. भावना जोशी यांचे online व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. यावर्षीच्या ‘Women in Science: Catalysing Viksit Bharat’ या संकल्पनेला अनुसरून डॉ. भावना जोशी यांनी विद्यार्थ्यांना बहुमोल मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य प्रा. डॉ. के. एन. सोनवणे उपस्थित होते.स्वतः वैज्ञानिक प्रगतीचे नेतृत्व करणाऱ्या भारतीय महिलांचे एक आदर्श उदाहरण असलेल्या प्रमुख वक्त्या डॉ. भावना जोशी (Carbon Composite Energy Nanomaterials Research Center, South Korea) यांनी आपल्या भाषणात भौतिकशास्त्रातील नवीन प्रवाह आणि संशोधनावर प्रकाश टाकला. तसेच बीएससी आणि एमएस्सी. भौतिकशास्त्रानंतर उपलब्ध असणाऱ्या विविध नोकरीच्या आणि उच्च शिक्षणाच्या संधी. राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील महत्त्वाच्या परीक्षांची माहिती दिली .संशोधनासाठी परदेशात (Abroad) उपलब्ध असणारी क्षेत्रे आणि शिष्यवृत्ती याविषयी माहिती देऊन केवळ ‘हार्ड स्किल्स’वर अवलंबून न राहता व्यावसायिक यशासाठी ‘सॉफ्ट स्किल्स’ आत्मसात करण्याचे महत्त्व याविषयी विस्तृत असे मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि वक्त्यांचा परिचय भौतिकशास्त्र विभाग प्रमुख डॉ. सौ. पी. एम. रावतोळे यांनी केला. आपल्या प्रास्ताविकात त्यांनी राष्ट्रीय विज्ञान दिनाची पार्श्वभूमी विशद करून विज्ञानातील महिलांच्या वाढत्या प्रभावाचे कौतुक केले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. व्ही. आर. हुसे यांनी केले, तर आभार धनंजय चौधरी यांनी मानले. सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी दर्शन पाटील यांनी विशेष परिश्रम घेतले.या प्रसंगी महाविद्यालयातील प्रा. डॉ. बी. एम. सपकाळ, प्रा. डॉ. पी. के. लभाने, श्री. जितेन धोबी, संदीप पाटील, निलेश भाट, जितेंद्र कोळी यांच्यासह बहुसंख्येने विद्यार्थी उपस्थित होते. या व्याख्यानामुळे विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाप्रती नवी ओढ निर्माण झाली असून, करिअर नियोजनासाठी मोठी प्रेरणा मिळाल्याचे विद्यार्थ्यांनी नमूद केले.

















