Home महाराष्ट्र शेवगाव पोलिसांनी देशी बनावटीचे पिस्तूल बाळगणाऱ्या गुन्हेगाराच्या मुसक्या आवळल्या, वीस लाख पंचवीस...

शेवगाव पोलिसांनी देशी बनावटीचे पिस्तूल बाळगणाऱ्या गुन्हेगाराच्या मुसक्या आवळल्या, वीस लाख पंचवीस हजार ६०० रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त

शेवगाव पोलिसांनी देशी बनावटीचे पिस्तूल बाळगणाऱ्या गुन्हेगाराच्या मुसक्या आवळल्या, वीस लाख पंचवीस हजार ६०० रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त

 

 

 

(सुनिल नजन “चिफब्युरो” स्पेशल क्राईम रिपोर्टर अहिल्यानगर जिल्हा)

शेवगाव पोलीसांना गुप्त खबऱ्या मार्फत माहिती मिळाली होती की दिनांक १२ फेब्रुवारी रोजी रात्री आकरा वाजण्याच्या सुमारास आखेगाव रोड परिसरात एक काळ्या रंगाची विना नंबर ची स्कार्पिओ गाडी संशयित रित्या फिरत असुन त्या गाडीच्या संशयित हालचाली सुरू आहेत. त्या पद्धतीने शेवगाव पोलिसांनी सापळा रचून संशयित रीत्या फिरणाऱ्या वाहनांची कसुन तपासणी केली असता त्या गाडीत पोलिसांना एक देशी बनावटीचे पिस्तूल,एक मॅगझिन आणि दोन जिवंत काडतुसे आढळून आली होती.सदर गाडीत संशयित आरोपी जावेद मुनिर सय्यद (वय वर्षे २७), राहणार आखेगाव रोड, शेवगाव,जिल्हा अहिल्यानगर हा मिळून आला होता.पोलीसांनी त्याला शेवगाव पोलिस स्टेशनमध्ये आणून त्याची झाडा झडती घेतली असता त्यांना देशी बनावटीचे पिस्तूल अंदाजे किंमत २० हजार रुपये, एक मॅगझिन किंमत ५०० रुपये, दोन जिवंत काडतुसे किंमत १०० रूपये,सॅमसंग कंपनीचा एक A24 मोबाईल किंमत ८० हजार रुपये,सॅमसंग कंपनीचा A23 मोबाईल किंमत २५ हजार रुपये, काळ्या रंगाची विना नंबरची S11 स्कार्पिओ अंदाजे किंमत १९ लाख रुपये, असा एकूण २० लाख २५ हजार ६०० रुपये किंमतीचा मुद्देमाल मिळून आला होता आणि मग तो पोलिसा कडून जप्त करण्यात आला आहे.आणि सदर तरूणास अटक ही करण्यात आली आहे. या कारवाईमुळे शेवगाव तालुक्यात प्रचंड प्रमाणात खळबळ उडाली आहे.शेवगाव

पोलीसांनी या प्रकरणी शेवगाव पोलीस स्टेशन मध्ये गु.र.नं. ८५/२०२६ अन्वये भारतीय हत्यार कायदा कलम ३/२५ प्रमाणे गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे साहेब हे करीत आहेत.

सदरची ही कारवाई अहिल्या नगर जिल्हा पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे साहेब यांच्या मार्गदर्शना खाली शेवगाव पोलीसांच्या विषेश पोलिस पथकाने केली आहे.गुन्हेगारा विरोधात कठोर भूमिका घेत आरोपीच्या मुसक्या आवळन्या साठी शेवगाव पोलीस सज्ज असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.संपुर्ण अहिल्या नगर जिल्ह्यातील गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांना वेसन घालने ही अहिल्यानगर जिल्हा पोलिस खात्याची जबाबदारी आहे. जिल्ह्यात अजूनही गुन्हेगारी कारवाया सुरू आहेत त्या कोण थांबवणार आहे हा सर्व सामान्य लोकांना पडलेला प्रश्न आहे.

Don`t copy text!