चोपडा येथील दादासाहेब डॉ. सुरेश जी. पाटील महाविद्यालयात दि.०९ व १० जानेवारी २०२६ रोजी रंगणार ‘वार्षिक स्नेहसंमेलन’

चोपडा येथील दादासाहेब डॉ. सुरेश जी. पाटील महाविद्यालयात दि.०९ व १० जानेवारी २०२६ रोजी रंगणार ‘वार्षिक स्नेहसंमेलन’

 

 

 

चोपडा: येथील महात्मा गांधी शिक्षण मंडळाचे दादासाहेब डॉ.सुरेश जी.पाटील महाविद्यालयात दि.०९ व १० जानेवारी, २०२६ यादरम्यान ‘वार्षिक स्नेहसंमेलनाचे’ आयोजन करण्यात आलेले आहे. दि.०९ जानेवारी २०२६ रोजी या वार्षिक स्नेहसंमेलनात विविध स्पर्धा, शेला पागोटे कार्यक्रम, सांस्कृतिक कार्यक्रम, आनंद मेळावा इत्यादींचे आयोजन करण्यात आलेले आहे. या वार्षिक स्नेहसंमेलनाचे उदघाटन अमळनेर येथील प्रांताधिकारी मयूर भंगाळे यांच्या हस्ते होणार असून शिरपूर येथील ‘आयतं पोयतं सख्यानं’ या नाट्याचे सुप्रसिद्ध अहिराणी विनोदी एकपात्री नाटककार प्रवीण माळी यांचा भन्नाट विनोदी नाट्य सादरीकरणाचा कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महात्मा गांधी शिक्षण मंडळाचे अध्यक्ष अॅड. संदीप सुरेश पाटील हे उपस्थित राहणार असून प्रमुख अतिथी म्हणून चोपडा येथील तहसिलदार भाऊसाहेब थोरात, चोपडा येथील नायब तहसिलदार योगेश पाटील तसेच संस्थेच्या सचिव डॉ.सौ. स्मिताताई संदीप पाटील व संस्थेचे कार्यकारी मंडळ सदस्य आदि मान्यवर उपस्थित राहणार आहेत. या वार्षिक स्नेहसंमेलन सांस्कृतिक कार्यक्रमाचे उदघाटन चोपडा येथील पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक सुजित पाटील यांच्या हस्ते होणार आहे. त्याचप्रमाणे चोपडा येथील पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी अजित पाटील यांच्या हस्ते आनंद मेळाव्याचे उदघाटन होणार आहे तर चोपडा येथील माजी नगरसेविका सौ.लता गौतम छाजेड यांच्या हस्ते पाककला स्पर्धेचे उदघाटन करण्यात येणार आहे.

 

दि.१० जानेवारी २०२६ रोजी वार्षिक स्नेहसंमेलनाचा समारोप व पारितोषिक वितरण कार्यक्रम संपन्न होणार असून धुळे येथील गटविकास अधिकारी वैभवी राजेंद्र ठाकरे व चोपडा येथील साईबाबा हॉस्पिटलच्या सुप्रसिद्ध स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. योगिता काटे यांच्या उपस्थितीत पार पडणार आहे.

 

तरी या स्नेहसंमेलनामध्ये महाविद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवावा तसेच उपस्थित राहावे, असे आवाहन महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा.डॉ.के.एन.सोनवणे, उपप्राचार्य प्रा.डॉ.आर.एम.बागुल, उपप्राचार्य प्रा.डॉ.ए.बी.सूर्यवंशी, समन्वयक डॉ.एस.ए.वाघ, कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य पी.एस.पाडवी, पर्यवेक्षक व कनिष्ठ विभागाचे स्नेहसंमेलन प्रमुख ए.एन.बोरसे, रजिस्ट्रार डी.एम.पाटील तसेच वरिष्ठ विभागाचे स्नेहसंमेलन प्रमुख व्ही.पी.हौसे यांनी केले आहे.