चोपडा महाविद्यालयात ‘जागतिक ग्राहक दिन’ उत्साहात साजरा

चोपडा महाविद्यालयात ‘जागतिक ग्राहक दिन’ उत्साहात साजरा

चोपडा: येथील महात्मा गांधी शिक्षण मंडळाचे दादासाहेब डॉ. सुरेश जी. पाटील महाविद्यालयातील वाणिज्य विभागातर्फे ग्राहकांचे हक्क समजून घेण्यासाठी व विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती निर्माण करण्यासाठी व्याख्यान आयोजित करण्यात आले होते.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे उपप्राचार्य एन.एस.कोल्हे हे उपस्थित होते. याप्रसंगी कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते म्हणून ॲड. एस. डी. पाटील, अर्थशास्त्र विभाग प्रमुख व्ही. पी .हौसे., वाणिज्य विभाग प्रमुख डॉ. सी आर देवरे आदि मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ.सी. आर. देवरे यांनी केले.
यावेळी विद्यार्थ्यांना ग्राहक दैनंदिन जीवन जगत असताना दिवसाच्या पहिल्या क्षणापासून ते शेवटच्या क्षणापर्यंत ग्राहकाची भूमिका करावी लागते. या भूमिकेत असताना सामान्य व्यक्ती हा अनेक गोष्टींमध्ये वस्तू खरेदी करताना त्याची फसवणूक होत असते त्या फसवणुकीतून कशाप्रकारे वाचावे याचे मार्गदर्शन ॲड. एस.डी पाटील यांनी केले.
यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्षीय मनोगत व्यक्त करतांना उपप्राचार्य एन. एस. कोल्हे म्हणाले की, ‘आजच्या या संगणकाच्या व मोबाईलच्या युगात अनेक प्रमाणात वस्तू खरेदी करताना सामान्य माणसाची दिशाभूल करण्यात येत आहे त्यामुळे ग्राहकांनी जागरूक रहायला हवे. यावेळी सौ हर्षा देवरे, पुनम जैन,अश्विनी जोशी, कोमल पाटील आदि उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे सूञसंचालन व आभार प्रदर्शन चेतन बाविस्कर यांनी केले. या कार्यक्रमास वाणिज्य विभागाचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.