कोपरे येथे तहसीलदारांनी खुला करून दिलेल्या शिव पांदन रस्त्यावर प्रवास करण्या वरून तुफान हाणामारी,जिल्हा पोलिस अधीक्षक यांच्याकडे ग्रामस्थांची तक्रार दाखल?
(सुनिल नजन “चिफब्युरो” स्पेशल क्राईम रिपोर्टर अहिल्यानगर जिल्हा) महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री नामदार चंद्रशेखर बावनकुळे यांनी राज्यातील शिव रस्ते,पांदन रस्ते, शेत रस्ते हे खुले करण्या बाबत जिल्हाधिकारी, प्रांताधिकारी, तहसीलदार, मंडल अधिकारी, तलाठी यांना लेखी आदेश देऊन तात्काळ कार्यवाही करण्या साठी सुचित केलेले आहे. त्याच आधारे अहिल्या नगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील कोपरे येथे गावठाण ते आंधळे वस्ती हा पांदन शिवरस्ता हा दिनांक १२ नोव्हेंबर २०२५ रोजी पाथर्डीचे तहसीलदार उद्धव नाईक साहेब यांच्या आदेशान्वये पोलिस बंदोबस्तात खुला करून देण्यात आलेला होता. परंतु या रस्त्याने जाण्या येण्याच्या कारणा वरून दोन गटात तुफान हाणामारी झाली आहे.त्यामुळे आता गावातील वातावरण दुषीत झाले आहे. मागिल काही दिवसापुर्वी याच गावातील वयोवृद्ध प्रगतशील शेतकरी स्व.एकनाथ अहिलाजी आव्हाड यांचे दिनांक १७ नोव्हेंबर २०२५ रोजी सकाळी निधन झाले होते.त्यांच्या अंत्यविधीला आप्त,स्वकीय, नातेवाईक, पाहुणे, पंचक्रोशीतील अनेक जण येणार होते म्हणून त्यांच्या घराकडे जाणाऱ्या याच पांदन रस्त्यावर पावसाने अनेक ठिकाणी खड्डे पडले होते.तो रस्ता व्यवस्थीत करण्यासाठी,सदर रस्त्याने जेसीबी मशीन जात असताना (ताराबाई भास्कर आव्हाड, शोभा बाबासाहेब आव्हाड,भास्कर भानुदास आव्हाड, सोमनाथ बाबासाहेब आव्हाड,गणेश भास्कर आव्हाड) हे सर्व राहणार कोपरे,तालुका पाथर्डी,जिल्हा अहिल्यानगर यांनी अडवले होते.या रस्त्याने आम्ही कोणालाही जाऊ देणार नाही.आम्ही तहसीलदार, कलेक्टर,यांना घाबरत नाहीत आमचं कोणीही काहीही वाकडे करू शकत नाही.असे म्हणून जेसीबी मशीन जाऊ दिले नाही.व घाण घाण शिविगाळ केली. सदर लोकांनी अंत्यविधी साठी येणाऱ्या लोकांना तहसीलदार यांनी खुला करून दिलेल्या शिव पांदन रस्त्यावरून येवू जाऊ दिले नाही.त्यामुळे अंत्यविधी साठी येणाऱ्या लोकांना खूप मोठ्या संकटांना सामोरे जावे लागले होते.रस्ता दुरूस्ती साठी जेसीबी मशिन घेऊन जाणाऱ्या भरत छबुराव आंधळे यांना वरील लोकांनी घाण घाण शिविगाळ करून दमबाजी केली.आणि शेवटी जेसीबी मशीन जाऊ दिले नाही. तसेच याच रस्त्याने नितीन अशोक आव्हाड, आणि अर्जुन रखमाजी आंधळे हे दोघे जण जात असताना वरील लोकांनी त्यांना ही जाण्या येण्यासाठी मज्जाव केला. व परत या रस्त्याने आले तर तुमचा मुडदा पाडू,एक एकाचा खून करू, हातपाय तोडू, अशी दमबाजी करून या दोघांना वरील पाच लोकांनी लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.व जीवे ठार मारण्याची धमकी दिली.सदरचा रस्ता हा सामुहिक रस्ता असुन या सामुहिक रस्त्यांवरून जाण्या येण्यासाठी वरील लोकांनी मज्जाव केला आहे.सदरचा रस्ता हा पाथर्डीचे तहसिलदार साहेब यांनी गैर अर्जदारा समक्ष खुला केलेला असुन त्यावर त्यांच्या सह्या आहेत.असे असताना देखील वरील पाच लोक हे जाणिव पुर्वक गावातील लोकांना वेठीस धरण्यासाठी आडमुठे पणाची भुमिका घेउन सदरचा हा रस्ता बंद करीत आहेत.तसेच याच रस्त्याने जाताना वाटेत लक्ष्मी माता मंदिर आहे.या मंदिरात पूजा करण्यासाठी मळू मल्हारी बोरुडे आणि सुधाकर दादाबा बोरुडे हे जात असताना त्यांना ही मंदिरात पुजा अर्चा करण्यासाठी जाऊ दिले जात नाही.व त्यांना जातीवाचक शिवीगाळ करून तुम्ही मांग समाजाचे आहात अशी भाषा वापरून पुजा अर्चा करू दिली जात नाही.व घाण घाण शिविगाळ केलीजाते.त्यामुळे त्यांच्या धार्मिक भावना दुखावल्या व त्यांना घाण घाण शिविगाळ करून हुसकावून लावले जाते.तसेच विष्णू हरकू उघडे यांना ही सदर रस्त्यावरून जाताना दोनदा हरकत करून शिवीगाळ केली होती.तसेच वरील आडकाठी करणारे लोक म्हणतात की तुम्ही पुन्हा या रस्त्याने आलात तर तुमच्या विरुद्ध खोटा विनयभंगाचा गुन्हा दाखल करून तुम्हाला खोट्या गुन्ह्यात अडकवून जेलमध्ये टाकू.व खडी फोडायला लावू असा दम दिला जातो.अशा प्रकारे वरील रस्ता अडवणारे लोक हे खुप आडदांड व नंगट असुन ते कोणालाही घाबरत नाही.दादागीरी व पैशाच्या जोरावर ते संपूर्ण गावाला वेठीस धरत आहेत.सदरचा रस्ता हा सार्वजनिक आहे. तहसील साहेबांनी सर्वा समक्ष खुला केलेला आहे. तरीही वरील लोक हे या आदेशाला जुमानत नाहीत.सदर रस्त्यांवरून जाऊ येउ न दिल्यामुळे कोपरे ग्रामस्थांची फार मोठी गैरसोय होत आहे.गावात जाणे येणे, शाळेतील मुलांना घेऊन जाणे येणे,आजाऱ्यांना दवाखान्यात घेऊन जाणे येणे,शेतात मशागतीसाठी जाणे येणे हे सर्व आता बंद झाले आहे.त्यामुळे कोपरे ग्रामस्थांचे फार मोठे नुकसान झाले आहे.तरी सदर रस्ता अडवणाऱ्या लोका विरूद्ध गुन्हा दाखल करण्यात येऊन त्यांच्या विरोधात कठोर कारवाई करण्यात येऊन कोणालाही सदर रस्त्यावरून प्रवास करताना हरकत करण्यात येऊ नये अशी संबंधितांना तंबी देण्यात यावी असे जिल्हा पोलिस अधीक्षक यांच्याकडे दाखल करण्यात आलेल्या तक्रार अर्जात नमूद करण्यात आले आहे.या तक्रारीत नितीन आव्हाड,भरत आंधळे,रमेश आव्हाड, भाऊसाहेब उघडे, अर्जुन आंधळे,मळू बोरूडे,सुधाकर बोरुडे,आदिनाथ उघडे,विष्णू उघडे, रामकिसन आंधळे,शिवाजी उघडे,बबनराव उघडे,सुनिल आव्हाड, अंबादास आव्हाड,मळू उघडे,रामा उघडे यांच्या सह कोपरे गावातील एकूण २८ लोकांच्या या तक्रार अर्जावर सह्या आहेत. जिल्हा पोलिस अधीक्षक नेमकी काय कारवाई करतात याकडे सर्व कोपरे ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.

























