माजीआमदार राजीवजी राजळे यांच्या ५६ व्या जयंती निमित्त वृद्धेश्वर साखर कारखाना येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन
(सुनिल नजन “चिफब्युरो” स्पेशल क्राईम रिपोर्टर अहिल्यानगर जिल्हा)
पाथर्डी तालुक्याचे झुंजार नेतेआणि माजी आमदार स्व.राजीवजी राजळे यांच्या ५६ व्या जयंती निमित्त शुक्रवार दि.५ डिसेंबर २०२५ रोजी सकाळी ८ते२ या वेळेत वृद्धेश्वर साखर कारखाना येथिल
न्यू इंग्लिश स्कूल, मध्ये भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.सिव्हिल सर्जन ब्लड बँक आणि सिव्हिल हॉस्पिटल अहिल्यानगर यांच्या संयुक्त विद्यमाने.या रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. रक्तदान हे सर्व श्रेष्ठ मानवसेवा आहे.रक्ताच्या
एका थेंबातून एक नवा जीव वाचवू शकतो.
एखाद्या रुग्णासाठी तो नवी आशा ठरू शकतो.
एखाद्या कुटुंबासाठी आनंद
तर एखाद्या बालकासाठी जीवनदान ही ठरू शकतो. म्हणून रक्तदान करणे ही आज काळाची गरज निर्माण झाली आहे.साखर कारखाना पंचक्रोशीतील सर्व सामान्य युवकांनी
मोठ्या संख्येने या सामाजिक कार्यक्रमास उपस्थित राहून आपले रक्तदान करावे असे आवाहन कासार पिंपळगाव येथील
स्वर्गिय राजीवजी राजळे मित्र मंडळ आणि
श्रीराम मित्र मंडळ आदिनाथनगर यांच्या वतीने करण्यात आले आहे.

























