शेतकर्‍यांचे पन्नास लाख बँकेत पडुन :पाचोरा कॉग्रेस चे बँक प्रसासनाला निवेदन

शेतकर्‍यांचे पन्नास लाख बँकेत पडुन :पाचोरा कॉग्रेस चे बँक प्रसासनाला निवेदन

पाचोरा (प्रतिनिधी) – स्टेट बँकेची थकीत कर्जबाजारी शेतकर्यांसाठी आलेल्या योजना चा बँकेच्या नियोजना अभावी बोजवारा उडाला असुन तात्काळ कर्जफेड चे दाखले द्यावे म्हणून कॉग्रेस ने एका निवेदनाद्वारे मागणी केली आहे

भारतीय स्टेट बैंकेने डीसेंबर २०२० मध्ये ऋण समाधान नावाची थकीत शेतकऱ्यांसाठी योजना आणली होती या योजने बाबत स्थानिक बँक अधिकारी यांनी जवळपास विस हुन अधिक शेतकऱ्यांचा विश्वास संपादन करून या योजनेत बचत खात्यात कर्ज फेडण्यासाठी ची ठरलेली रक्कम चा भरणा करायला भाग पाडले असता शेतकऱ्यांची ही रक्कम जवळपास पन्नास लाखाहुन अधिक शेतकऱ्यांच्या बचत खात्यात भरले गेली त्यामुळे शेतकऱ्यांचे आणि बँकेचे आर्थिक नुकसान होत आहे. सदर रक्कमेला सहा महिने झाले तरी देखील सबंधित शेतकर्‍यांना अद्यापही कर्जफेडीचा दाखला मिळाला नाही त्यामुळे आज येथील कॉग्रेस तालुका अध्यक्ष सचिन सोमवंशी, शहर अध्यक्ष अॅड अमजद पठाण, यांच्या नेतृत्वाखाली बँक मॅनेजर मच्छिंद्र दुधल यांना निवेदन देण्यात आले यावेळी जिल्हा उपाध्यक्ष विकास वाघ, तालुका सरचिटणीस प्रताप पाटील, अल्पसंख्याक जिल्हा उपाध्यक्ष इरफान मनियार, तालुका अध्यक्ष शरीफ खाटीक, युवक विधानसभा अध्यक्ष संदीप पाटील, सोशल मीडिया विधानसभा अध्यक्ष राहुल शिंदे, तालुका अध्यक्ष कल्पेश येवले, श्री खरे, युवक काँग्रेसचे ऋषीकेश पाटील आदी उपस्थित होते यावेळी शाखा व्यवस्थापक श्री. दुधल यांच्याशी चर्चा करण्यात आली मॅनेजर यांनी शेतकऱ्यांचे आणि बँकेचे आर्थिक नुकसान होत असल्याचे मान्य केले मात्र टेक्निकल समस्या असल्याचे सांगितले यावेळी कॉग्रेस पदाधिकारी यांनी शेतकऱ्यांना लवकर कर्जफेडीचा दाखला न दिल्यास सनदशीर मार्गाने आंदोलन करण्याचा इशारा दिला