अरुणभाऊ मुंढेच्या दिवाळी फराळाला वंचित आघाडीची हजेरी, शेवगाव पाथर्डी विधानसभा मतदारसंघात राजकीय समीकरणे बदलण्याची चिन्हे ?

अरुणभाऊ मुंढेच्या दिवाळी फराळाला वंचित आघाडीची हजेरी, शेवगाव पाथर्डी विधानसभा मतदारसंघात राजकीय समीकरणे बदलण्याची चिन्हे ?

 

 

 

(सुनिल नजन “चिफब्युरो” स्पेशल क्राईम रिपोर्टर अहिल्यानगर जिल्हा) निवडणूकीच्या रिंगणात भारतीय जनता पार्टी आणि वंचित बहुजन आघाडी हे राजकारणात एकमेकांचे कट्टर राजकीय शत्रू आहेत. निवडणुकीच्या आखाड्यात एकमेकांना शह काटशह देत एकमेकांवर जोरदार कुरघोडी करताना कठोर शब्दांत टीकेच्या फैरी झाडणारे भाजपा आणि वंचित बहुजन आघाडीचे नेते हे मात्र दिवाळी फराळाला एकत्र आल्यामुळे शेवगाव तालुक्यातील राजकीय समीकरणे बदलण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. शेवगाव पाथर्डी विधानसभा मतदारसंघात सर्वात प्रथम दिवाळी फराळाचे लाडू वाटून भाजपाचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस अरूणभाउ मुंडे यांनी मतदार संघातील रथी महारथी असलेल्या राजळे, घुले,ढाकणे, काकडे या सर्वच राजकीय पुढाऱ्यांना मागे टाकून बाजी मारलेली आहे. आणि आगामी नगरपालिका, जिल्हा परिषद, आणि पंचायत समिती निवडणूकीची जोरदार तयारी सुरू केली आहे.या फराळाची चर्चा संपूर्ण अहिल्यानगर जिल्ह्यातील राजपटलावर सुरू झाली आहे.उदय मुंढे आणि अरूणभाउ मूंढेचे राजकारण भल्या भल्यां राजकारण्यांना चांगलीच धडकी भरवणारे आहे.ते नेमकी काय जादू करून विरोधकांच्या तंबूत शिरतात हे एक न उलगडणारे कोडेच आहे.या दिवाळी फराळाला वंचित बहुजन आघाडीचे राज्य प्रवक्ते प्राध्यापक किसनराव चव्हाण आणि त्यांच्या सर्व शिलेदारांना आमंत्रित करून त्यांचा यथोचित मान सन्मान करून त्यांना यथेच्छ प्रिती भोजन देऊन मुंढे बंधूंनी शेवगाव तालुक्यातील राजकारणात चांगलीच खळबळ उडवून दिली आहे. निमित्त दिवाळी फराळाचे असले तरी पडद्यामागे बऱ्याच गोपनीय राजकीय हालचाली सुरू झाल्याचा आभास निर्माण झाला आहे.असे राजकीय धुरंधर निरीक्षकांचे म्हणणे आहे.अरुणभाऊ मुंढे यांनी गेल्या उन्हाळ्यात मुख्यमंत्र्यांच्या नावाने देवाभाउ कुस्ती स्पर्धा भरवून राज्यातील नामवंत पैलवानांना बक्षिसे देऊन पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील, नामदार चंद्रशेखर बावनकुळे साहेब, महाराष्ट्र विधान परीषदेचे सभापती नामदार राम शिंदे साहेब यांना आमंत्रित करून हम किसी से कम नहीं हे दाखवून दिले होते.मुंढे बंधूंचा करिष्मा असलेला राजकीय वारू नेमका कोणत्या दिशेने जाणार हे आगामी काळात दिसणार आहे.मुंढे बंधूंच्या या दिवाळी फराळाला अनेक छोट्या मोठ्या राजकीय पुढाऱ्यांनी हजेरी लावली होती त्या मुळे शेवगाव पाथर्डी विधानसभा मतदार संघातील अनेक राजकीय निरीक्षकांच्या भुवया उंचावल्या आहेत.