धरणगाव येथील प्रा. निर्मला पवार यांना पी. एच.डी… धरणगाव प्रतिनिधी

धरणगाव येथील प्रा. निर्मला पवार यांना पी. एच.डी…

धरणगाव प्रतिनिधी: धरणगाव येथील प्रा. निर्मला पवार यांना कवयत्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विदयापीठ जळगाव येथून पी.एच. डी. प्रदान करण्यात आली.त्याचा संशोधनाचा विषय,जळगाव जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील अनुजाती,अनुजमाती, तील महिलांच्या आर्थिक विकासात महिला बचत गटाच्या योगदानाचे अध्ययन हा होता.कॉमर्स अँड मॅनेजमेन्ट या विषयात त्यांनी पी. एच.डी. पदवी संपादन केली आहे.त्यांना शेंदूरणी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. के.व्ही.पाटील यांचे मार्गदर्शन लाभले यांचा अनमोल मार्गदर्शनाखाली त्यांनी पी. एच.डी संपादन केली. प्रा.निर्मला पवार ह्या आर.पी आय.(ए) चे माजी जिल्हासचिव व सामाजीक कार्यकर्ते मिलिंद पवार यांच्या लहान बहिण असून त्यांनी धरणगाव तालुक्यातून मागासवर्गीयमधून पहिली महिला पी. एच. डी.प्राप्त करणाऱ्या ठरल्या आहेत.गौतम नगर परिसरातून त्याचे मोठे कौतुक होत आहे.