श्री. गो.से. हायस्कूल पाचोरा येथे तालुकास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेचे उद्घाटन संपन्न
… पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्था संचलित श्री. गो.से. हायस्कूल पाचोरा येथे सोमवार दि.18 ऑगस्ट रोजी श्री. गो.से.हायस्कूल पाचोरा व पाचोरा तालुका बुद्धिबळ असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने 14,17 व 19 वर्षाखालील तालुकास्तरीय शालेय बुद्धिबळ स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्रीनिवास हॉस्पिटल संचालक डॉ.श्री.नरेश गवांदे हे होते. प्रमुख अतिथी म्हणून पाचोरा तालुका बुद्धिबळ संघटनेचे अध्यक्ष मा. भाईसो.श्री. दुष्यंत रावल, उपाध्यक्ष मा. दादासो.श्री.सुरज वाघ, संघटनेचे सचिव तथा श्री. गो.से. हायस्कूलचे मुख्याध्यापक मा. श्री.एन. आर ठाकरे सर, डॉ.सौ. अर्चना पाटील, सौ. उज्वला महाजन मॅडम,तालुका क्रीडा समन्वयक प्रा.श्री. गिरीश पाटील, गो.से. हायस्कूलचे उपमुख्याध्यापक श्री.आर.एल. पाटील सर, पर्यवेक्षिका सौ.ए. आर. गोहील मॅडम, श्री.आर.बी. तडवी सर, क्रीडा प्रमुख श्री.एस. पी.करंदे सर, माजी पर्यवेक्षक मा.श्री.ए.जे. महाजन सर, शहर व तालुक्यातील विविध शाळांचे क्रीडा शिक्षक व स्पर्धेत सहभागी विद्यार्थी उपस्थित होते.
. .. सर्वप्रथम वरील सर्व मान्यवरांचा शाळेच्या पदाधिकाऱ्यांनी स्वागत व सत्कार केला. संस्थेचे माजी अध्यक्ष स्व.आप्पासाहेब ओ.ना. वाघ यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली.
. संगीत शिक्षक श्री.सागर थोरात सर यांनी इशस्तवन सादर केले.
आपल्या मनोगतातून मा. भाईसो.श्री. दुष्यंत रावल व श्री. एन.आर. ठाकरे सर यांनी विद्यार्थी जीवनातील बुद्धिबळाचे महत्त्व समजावून सांगितले व विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.
.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. आर. बी. बोरसे सर यांनी केले व आभार श्री.एस.पी. करंदे सर यांनी मानले.
.