संत भगवान बाबा आणि वामनभाउ पुंण्यतिथी सोहळ्या निमित्ताने हनुमान टाकळीत किर्तन महोत्सव सोहळा संपन्न

संत भगवान बाबा आणि वामनभाउ पुंण्यतिथी सोहळ्या निमित्ताने हनुमान टाकळीत किर्तन महोत्सव सोहळा संपन्न

(सुनिल नजन अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी) संपूर्ण महाराष्ट्राचे आराध्यदैवत असलेल्या संत भगवान बाबा आणि संत वामनभाउ पुंण्यतिथी सोहळ्या निमित्ताने हनुमान टाकळी येथे किर्तन महोत्सव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.सर्व ह.भ.प.शिवाजी महाराज फुंदे, वैष्णवी महाराज राजळे, सुदर्शन महाराज कारखेले, अभिमन्यू महाराज भालसिंग, अनिल महाराज बर्डे, हरिश्चंद्र महाराज दगडखैर, अक्षय महाराज नागवडकर, महेश महाराज आव्हाड, आणि शेवटी ह.भ.प.आदिनाथ महाराज निकम यांचे काल्याच्या किर्तनाने महाप्रसादानंतर या सोहळ्याची सांगता झाली.यावेळी ह.भ.प.शिवनाथ महाराज दगडखैर, मोहनराव दगडखैर, अण्णा दगडखैर, राजेंद्र दगडखैर,कुशिनाथ बर्डे, आसाराम घुले, दत्तात्रय क्षिरसागर, मारुती क्षिरसागर,संत जनाबाई महिला मंडळाच्या अध्यक्षा सौ. चंद्रकला दगडखैर, रामनाथ खेडकर, यांच्या सह पंचक्रोशीतील हजारो भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.वृद्धेश्वर सहकारी साखर कारखाना येथे ही संत वामनभाउ पुंण्यतिथी सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.वैष्णवीदीदी पैठणकर, आणि विजयाताई बनसोड यांची किर्तने झाली.या सोहळ्यासाठी बाबासाहेब शिरसाट, जनार्दन शिरसाट, सुखदेव शिरसाट, अशोक शिरसाट, सोमनाथ शिरसाट, गणेश शिरसाट यांनी विशेष परिश्रम घेतले.