गुरुकुल इंटरनॅशनल स्कूलचा विजयाचा श्रीगणेशा: अक्षिता शेख तालुकास्तरीय कॅरम स्पर्धेत विजयी
पाचोरा (ता. प्रतिनिधी) – पाचोरा तालुक्यात दिनांक ५ ऑगस्ट २०२५ पासून सुरू झालेल्या तालुकास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धांमध्ये गुरुकुल इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थिनी अक्षिता शेख हिने वयोगट १७ कॅरम स्पर्धेत शानदार कामगिरी करत प्रथम क्रमांक पटकावला आहे. तिच्या या यशामुळे तिची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली असून, शाळेच्या यशाचा श्रीगणेशा अक्षिताने साधला आहे.
तालुकास्तरावर झालेल्या या स्पर्धेत विविध शाळांमधील अनेक स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. मात्र आपल्या अचूक फटका तंत्र आणि शांत संयमी खेळाच्या जोरावर अक्षिता शेख हिने निर्णायक विजय मिळवला. तिच्या या यशामुळे शाळेचा उत्साह द्विगुणित झाला आहे.
गुरुकुल इंटरनॅशनल स्कूलचे प्राचार्य प्रेम शामनानी, क्रीडा शिक्षिका साक्षी पवार, क्रीडा शिक्षक निरंजन राठोड व इतर शिक्षकवृंद यांनी अक्षिताचे अभिनंदन करत पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. विद्यालयात तिच्या या यशानंतर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
या विजयामुळे गुरुकुल इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थ्यांमध्ये नवा आत्मविश्वास संचारला असून, इतर विद्यार्थ्यांनाही प्रेरणा मिळाली आहे. तालुकास्तरावर मिळवलेले हे यश जिल्हास्तरावरही तिला नक्कीच यशस्वी ठरेल, असा विश्वास विद्यालय परिवाराने व्यक्त केला आहे.
विशेष म्हणजे तालुका स्तरीय स्पर्धेच्या पहिल्याच दिवशी विजयाचा श्री गणेशा गुरुकुल स्कूल पासून झाल्यामुळे विद्यार्थी व शिक्षकांचे कौतुक होत आहे.
























