टोकरे कोळी, महादेव कोळी, मल्हार कोळी व इतर आदिवासी समाजाच्या विविध मागण्यांसाठी एकवीरा देवी मंदिर धुळे पासून ते मुंबई मंत्रालय पर्यंत संघर्ष पदयात्रा

टोकरे कोळी, महादेव कोळी, मल्हार कोळी व इतर आदिवासी समाजाच्या विविध मागण्यांसाठी एकवीरा देवी मंदिर धुळे पासून ते मुंबई मंत्रालय पर्यंत संघर्ष पदयात्रा

 

 

टोकरे कोळी, महादेव कोळी, मल्हार कोळी व इतर आदिवासी समाजाच्या विविध मागण्यांसाठी दिनांक 17/11/2023 वार शुक्रवार रोजी एकवीरा देवी मंदिर धुळे पासून ते मुंबई मंत्रालय पर्यंत संघर्ष पदयात्रा बाबत.

महोदय,

वरील विषयाला अनुसरून आम्ही खालील सह्या करणारे विनंती निवेदन सादर करतो की अनेक वर्षापासून टोकरे कोळी, महादेव कोळी मल्हार कोळी समाजाला अनुसूचित जमातीच्या हक्कापासून राजकीय दबावापोटी वंचित ठेवले जात आहे त्यासाठी समाजाने अनेक आंदोलन केलीत त्यात मोर्चे, निदर्शने, धरणे, आमरण उपोषण, मतदानावर बहिष्कार, आत्मदहन, जलसमाधी, मा. राष्ट्रपतींकडे स्वच्छा मरण, रास्ता रोको, रेल रोको केलीत तरी देखील शासनाने दखल घेतली नाही व वेळेवर कायदेशीर दाखले मिळत नसल्यामुळे अनेक बेरोजगार तरुणांनी आत्महत्या केल्यात तरी देखील निर्दयी सरकारला जाग आली नाही.

तसेच 2009 मध्ये धुळे येथील मा. जिल्हाधिकारी कार्यालयावर हजोरोंच्या संख्येने आदिवासी टोकरे कोळी, महादेव कोळी, मल्हार कोळी जमातीचा मोर्चा न्याय मागण्यासाठी गेला असता त्या मोर्चा वर अमानुष लाठीचार्ज व गोळीबार केला त्यात भटूभाऊ कुवर यांचा जीव घेतला होता तरीदेखील शासनाने समाजाचे प्रश्न सोडवले नाहीत. मागील आंदोलनाच्या वेळी शासनाने दिनांक 8/2/2013 रोजी आदिवासी विभागाचा एक अभ्यास गट स्थापन केला होता या समितीकडे आदिवासी संघटनेमार्फत शासनाची अधिकृत प्रकाशने, इम्पीरियल डाटा आणि जिल्हा गॅझेट प्रख्यात मानवंशशास्त्रज्ञाचे व समाजशास्त्रज्ञाचे दुर्मिळ ग्रंथ, डेसिनिअल जनगणना अहवाल, संदर्भ पुस्तके, हायकोर्ट व सुप्रीम कोर्टाचे निकाल काही उपलब्ध असलेल्या 1950 पूर्वीच्या टोकरे कोळी, महादेव कोळी मल्हार कोळी च्या नोंदी देखील सोबत दिल्या 20/05/802, हात्या परंतु आजपर्यंत कोणताही ठोस निर्णय शासनाने घेतलेला नाही म्हणून दिनांक17/11/2023 वार शुक्रवार रोजी धुळे जिल्हा येथील एकविरा देवी मंदिरापासून मुंबई आग्रा NH 3 मार्गाने मालेगाव, चांदवड, नाशिक, इगतपुरी, शहापूर, ठाणे मार्ग मुंबई मंत्रालयावर 13 दिवसात म्हणजे दि. 28/11/23 किंवा एकूण दि. 29/11/2023 ला धडकणार आहे.

मागण्या :-

1) महाराष्ट्रातील आदिवासी टोकरे कोळी, महादेव कोळी, मल्हार कोळी यांच्या संदर्भात शासनाची अधिकृत प्रकाशाने, इम्पीरियल डाटा आणि जिल्हा गॅझेट, प्रख्यात मानवंशशास्त्रज्ञ व समाजशास्त्रज्ञ यांचे दुर्मिळ ग्रंथ डेसिनिअल जनगणना अहवाल, संदर्भ पुस्तके सुप्रीम कोर्टाचे माधुरी पाटील, आनंद काटोले, आदिम गोवारी समाज, फुल बेंच मिलिंद कटवारे व इंद्रा सॉनी यावरून सिद्ध होते की महाराष्ट्रातील समुद्र काठावरील मच्छीमार व सोनकोळी यांचा समावेश ओ.बी.सी. किंवा एस.बी.सी. मध्ये होतो उर्वरित सर्व कोळी हे टोकरे कोळी, महादेव कोळी व मल्हार कोळी या आदिवासी ग्रुपमधील आहेत म्हणून शासनाने तात्काळ तसा आदेश काढावा

2) अनुसूचित जमातीचे दाखले निर्गमित करण्यासाठी 23 जुलै 2010 रोजी महाराष्ट्र शासनाच्या आदिवासी कल्याण समितीने मा. सुरेश धस यांच्या नेतृत्वाखाली शासनाला ज्या शिफारसी केल्या आहेत त्या तात्काळ लागू कराव्यात.

3) अनुसूचित जमाती तपासणी समितीवर न्यायाधीश किंवा निवृत्त न्यायाधीशाची नेमणूक करावी. तसेच आदिवासी टोकरे कोळी महादेव कोळी, मल्हार कोळी व इतर आदिवासीकडे काही कारणास्तव लेखी पुरावा उपलब्ध नसेल व त्या उमेदवाराचा दावा असेल की मी खरा आदिवासी आहे तर त्याचे तसे प्रतिज्ञापत्र घेऊन किंवा त्याची डी. एन. ए. चाचणी घेऊन त्याला जातीचा दाखला व वैधता प्रमाणपत्र द्यावे.

4) खोटे दाखले देणाऱ्या उपविभागीय अधिकारी किंवा तपासणी समितीच्या अधिकाऱ्यांवर फौजदारी गुन्हा दाखल करावा असा कायदा आहे तसाच कायदा जर उपविभागीय अधिकारी किंवा तपासणी समितीच्या अधिकाऱ्यांकडून खऱ्या आदिवासींना जाणीवपूर्वक आपल्या जामातीच्या दाखल्या पासून वंचित केले गेले असेल तर त्यांच्यावर देखील फौजदारी गुन्हा दाखल करावा.

5) सर्व गरजू आदिवासींना शबरीची बेघर आणि शबरी वित्त महामंडळाच्या वैयक्तिक लाभाच्या योजना गरीब आदिवासींना तात्काळ मिळाव्यात. तसेच वन जमीन हक्कापासून वंचित आदिवासी शेतकऱ्यांना वन हक्क कायद्या अंतर्गत तात्काळ जमिनीचा लाभ मिळावा.6) टोकरे कोळी, महादेव कोळी, मल्हार कोळी समाजाच्या २००९ च्या धुळे येथील मोर्चावर झालेल्या अमानुष लाठी चार्ज व गोळीबाराची न्यायालयीन चौकशी करावी आणि समाजासाठी शहीद झालेल्या भटूभाऊ कुंवरांच्या परिवाराला भरीव अशी आर्थिक मदत करावी व कार्यकर्त्यांवर दाखल झालेले खोटे गुन्हे मागे घेण्यात यावेत तसेच महाराष्ट्रभर आंदोलनाचे आदिवासींवर दाखल झालेले सर्व गुन्हे मागे घेण्यात यावेत

शानाभाऊ सोनवणे

संस्थापक प्रमुख

गुलाब बाविस्कर

प्रदेश सचिव

श्री. किगहें गणेश इंगळे

सौ. कविताताई कोळी

महिला संघटक प्रमुख

प्रकाश (खन्नाभाऊ) कोळी प्रदेश उपप्रमुख खान्देश

वासुदेव चित् कार्याध्यक्ष

Images संजय मगरे

धुळे जिल्हा सचिव

प्रदेश उपप्रमुख विदर्भ

योगेश बाविस्कर

जळगाव जिल्हा प्रमुख

महा. उत्तर खान्देश प्रमुख

पवन सोनवणे

धुळे जिल्हा प्रमुख

किरण सावळे

दोंडाईचा शहर प्रमुख

माहितीस्तव प्रत रवाना :-

मा. राज्यपाल महाराष्ट्र राज्य

मा. आदिवासी विकासमंत्री महाराष्ट्र राज्य