कोपरे येथील तिन बचतगटातील महिलांचा दारूबंदी साठी पाथर्डी पोलिस स्टेशनमध्ये एल्गार,पोलिस निरीक्षक यांचे आजपासून दारूबंदीचे आणि कडक कारवाईचे महीलांना आश्वासन

कोपरे येथील तिन बचतगटातील महिलांचा दारूबंदी साठी पाथर्डी पोलिस स्टेशनमध्ये एल्गार,पोलिस निरीक्षक यांचे आजपासून दारूबंदीचे आणि कडक कारवाईचे महीलांना आश्वासन

 

(सुनिल नजन “चिफब्युरो” स्पेशल क्राईम रिपोर्टर अहिल्यानगर जिल्हा) हनुमान टाकळी,वडुले, वाघोली येथील अवैध धंदे बंद झाले आहेत,आता कोपरे येथील अवैध धंदे बंद करा अशी मागणी अहिल्यानगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील कोपरे येथील जय भगवान महीला बचत गट, अहिल्यादेवी महिला बचत गट, जिजामाता महिला बचतगट या तिन बचतगटातील महिलांनी पाथर्डी पोलिस स्टेशनचे कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक विलास पुजारी साहेब यांच्या कडे केली आहे. कोपरे गावचे ग्रामपंचायत सदस्य सुभाष आव्हाड यांच्या सौभाग्यवती गयाबाई सुभाष आव्हाड,आणि दुसऱ्या ग्रामपंचायत सदस्य सौ.सुमनबाई तुकाराम आव्हाड यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा सर्व बचत गटातील महीलांनी काढला होता. यावेळी बचत गटातील सर्व महीलांनी पोलिस निरीक्षक विलास पुजारी साहेब यांना एक निवेदन सादर करून गावातील अवैध धंदे बंद करण्याची मागणी केली आहे.तसेच पुढे असे नमूद करण्यात आले आहे की आम्ही कोपरे गावात जय भगवान महीला बचत गट,अहिल्यादेवी महीला बचतगट, जिजामाता महिला बचतगट असे तिनं बचतगट सदैव कार्यरत आहेत. शेजारी असलेल्या हनुमान टाकळी आणि वडुले वाघोली येथील सरपंच यांनी गावातील अवैध व्यवसाय बंद झाले आहेत. ते सर्व तळीराम कोपरे येथे दारु पिण्यासाठी येतात आणि गावात हैदोस घालतात.गावातील मुख्य रस्त्यावर या तळीरामांनी उच्छाद मांडला असल्याने गावातील महिला, शालेय विद्यार्थी, विद्यार्थिनी,व्रुद्ध नागरिक यांना रस्त्यावरून चालणे अवघड झाले आहे.गावात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर बनला आहे.गावातील सामाजिक कार्यकर्त्यांनी हे अवैध धंदे बंद करण्यासाठी ग्रामपंचायती मार्फत संबंधितांना वेळोवेळी सुचना देऊनही गावातील अवैध धंदे काही बंद होताना दिसत नाहीत.गावच्या द्रुष्टीने ही फार मोठी शोकांतिका निर्माण झाली आहे.या अवैध धंद्यामुळे गावातील महीलांना अतिशय त्रास सहन करावा लागत आहे.अनेक महीलांना मारहाणीचे प्रकार झाले आहेत.दारूडे हे सार्वजनिक ठिकाणी रस्त्यावरून चालताना मोघमपणे अर्वाच्य भाषेत शिविगाळ करत आहेत. तसेच गावात भुरट्या चोऱ्यांचे प्रमाण ही मोठ्या प्रमाणात वाढले आहे.कोपरे गावातील सदर अवैध धंदे बंद न झाल्यास आम्ही सर्व बचत गटातील महिला जिल्हा पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे साहेब यांच्या कार्यालया समोर उपोषणास बसणार आहोत असा इशारा पोलीसांना दिलेल्या निवेदनात देण्यात आला आहे.अवैध धंदे करणारावर कडक कारवाई करण्यात यावी आणि ते कायमचे बंद करण्यात यावे यासाठी बचत गटातील महिला आशाबाई अशोक आव्हाड,रेखा वसंत आव्हाड, सुनिता मारुती घुले, ताराबाई लहाणू खरात, सत्यभामा जगन्नाथ उघडे, आशाबाई नवनाथ उघडे,शितल संदिप शिंदे,कलाबाई महादेव वाघमोडे,सुनिता अशोक वाघमोडे,ताईबाई नानाभाऊ उघडे,नंदा भगवान शेंडगे, सुमनबाई आव्हाड, गयाबाई आव्हाड यांनी पोलीसांना दिलेल्या निवेदनावर अंगठे/सह्या केल्या आहेत.तसेच या निवेदनाची एक प्रत जिल्हा पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे साहेब यांनाही पाठविण्यात आली आहे.पाथर्डी पोलिस स्टेशनचे कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक विलास पुजारी साहेब यांनी शेजारच्या पाडळी गावातील अवैध धंदे बंद केले आहेत आता आजपासूनच तुमच्या गावातील अवैध धंदे बंद होतील असे आश्वासन उपस्थित सर्व महीलांना दिले आहे.तसेच बचतगटातील एका महीलेने मारहाणी बाबद आपल्या पती विरोधात पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली होती त्याचीही दखल घेऊन मीरी बीट हवालदारांना कडक कारवाई करण्याच्या सुचना देण्यात आलेल्या आहेत.पाथर्डी पोलिस स्टेशनचे कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक नेमकी काय कारवाई करतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.