Home जळगाव चोपडा महाविद्यालय येथे ‘तीन दिवसीय विद्यापीठस्तरीय कला गुण कौशल्य कार्यशाळेचे’ आयोजन

चोपडा महाविद्यालय येथे ‘तीन दिवसीय विद्यापीठस्तरीय कला गुण कौशल्य कार्यशाळेचे’ आयोजन

चोपडा महाविद्यालय येथे ‘तीन दिवसीय विद्यापीठस्तरीय कला गुण कौशल्य कार्यशाळेचे’ आयोजन

 

चोपडा:  येथील महात्मा गांधी शिक्षण मंडळाचे दादासाहेब डॉ. सुरेश जी.पाटील महाविद्यालय व कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव विद्यार्थी विकास विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने दि. ५ ते ७ मार्च २०२६ दरम्यान तीन दिवसीय विद्यापीठस्तरीय कला गुण कौशल्य कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यशाळेचे उदघाटन दि. ५ मार्च २०२६ रोजी स्मार्ट हॉल येथे कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगावचे अधिसभा सदस्य प्रा. डॉ. संदिप नेरकर यांच्या हस्ते होणार आहे. या शिबिराच्या उदघाटन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्र. प्राचार्य प्रा. डॉ. के. एन. सोनवणे हे उपस्थित राहणार आहेत.

या उदघाटन कार्यक्रमाप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून महात्मा गांधी शिक्षण मंडळाचे अध्यक्ष ऍड. संदीप सुरेश पाटील, सचिव डॉ. सौ. स्मिता संदीप पाटील, विद्यार्थी विकास विभागाचे जळगाव जिल्हा समन्वयक डॉ. संजय पाटील, चोपड्याचे सहाय्यक वन संरक्षक श्री. महेंद्र पाटील, चोपडा वन परिक्षेत्र अधिकारी श्री. बी. के. थोरात, वैजापूर वन परिक्षेत्र अधिकारी विकेश ठाकरे, कार्यशाळेचे निरीक्षक डॉ. स्वप्निल खरे व डॉ. अजय पाटील, उपप्राचार्य प्रा. डॉ. आर. एम. बागुल, उपप्राचार्य प्रा. डॉ. ए. बी. सूर्यवंशी, समन्वयक डॉ. एस. ए. वाघ, रजिस्ट्रार डी. एम. पाटील आदि मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

या कार्यशाळेप्रसंगी विविध मान्यवरांच्या व्याख्यानांचे आयोजन करण्यात आले असून नाट्य, नृत्य व संगीत या संदर्भात प्रात्यक्षिक सुद्धा घेण्यात येणार आहे.

या कार्यशाळेचे समारोप दि. ७ मार्च २०२६ रोजी होणार आहे.

तरी सदर कार्यशाळेचा विद्यापीठ परिक्षेत्रातील जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन महाविद्यालयाचे प्र. प्राचार्य प्रा. डॉ. के. एन. सोनवणे, उपप्राचार्य प्रा. डॉ. आर. एम. बागुल, उपप्राचार्य प्रा. डॉ. ए. बी. सूर्यवंशी, समन्वयक डॉ. एस. ए. वाघ, रजिस्ट्रार डी. एम. पाटील, विद्यार्थी विकास विकास अधिकारी डॉ. डी. डी. कर्दपवार व आयोजन समितीने केले आहे.

Don`t copy text!