कॉग्रेस सोशल मीडिया पदाधिकारीने मोबाइल केला परत ऑनलाईन अभ्यास करणारा विद्यार्थीला आंनद झाला

कॉग्रेस सोशल मीडिया पदाधिकारीने मोबाइल केला परत
ऑनलाईन अभ्यास करणारा विद्यार्थीला आंनद झाला

पाचोरा (प्रतिनिधी) – ऑनलाईन अभ्यास करणार्‍या मध्यमवर्गीय विद्यार्थी चा हरवलेला मोबाईल कॉंग्रेस सोशल मीडिया पदाधिकारीने प्रामाणिक पणे परत केल्याने विद्यार्थीचा आनंद गगनात मावेना

शहरातील नवकार प्लाझा परीसरात साई पार्क परिसरात राहणाऱ्या दिनेश देविदास जाधव या शालेय विद्यार्थी चा मोबाईल हरवला सदर चा मोबाईल हा कॉंग्रेस सोशल मीडिया विधानसभा अध्यक्ष राहुल शिंदे यांना सापडल्यावर त्यांनी कॉंग्रेस तालुका अध्यक्ष सचिन सोमवंशी यांच्या कडे जमा केल्यावर ज्या विद्यार्थी चा मोबाईल हरवला त्याला कॉंग्रेस कार्यालयात बोलावून राहुल शिंदे यांनी प्रामाणिकपणे परत केला. यावेळी सदर विद्यार्थी हा भावनावेश झाला, जर मोबाईल मिळाला नसता तर माझे शालेय नुकसान खुप झाले असते पुन्हा मोबाईल नवीन घेण्यासाठी अडचण होती त्यामुळे मी श्री शिंदे यांचे आभार व्यक्त करतो आणि माझ्या परीने लहानसे बक्षीस देतो असे मोबाईल मालक जाधव याने सांगितले असता श्री शिंदे यांनी बक्षीस घेण्यास देखील नकार दिला यावेळी कॉंग्रेस तालुका अध्यक्ष सचिन सोमवंशी, पत्रकार किशोर रायसाकडा आदी उपस्थित होते