ओबीसीचे रद्द झालेले राजकीय आरक्षण बचाव जनसंपर्क अभियान- मेळावा तालुका- पाचोरा,जिल्हा – जळगाव येथे संपन्न.

ओबीसीचे रद्द झालेले राजकीय आरक्षण बचाव जनसंपर्क अभियान- मेळावाच्या पहिल्या बैठकीला जळगाव जिल्ह्यातून सुरुवात.

विषय:- ओबीसीचे रद्द झालेले राजकीय आरक्षण बचाव जनसंपर्क अभियान- मेळावा तालुका- पाचोरा,जिल्हा – जळगाव येथे संपन्न.

पाचोरा येथे आज ओबीसी- बहुजन समाजाचा आवाज घुमला.

ओबीसी नेते अनिल महाजन यांनी केले समाज बांधवांना मार्गदर्शन.

दि.१६/०८/२०२१ रोजी जळगाव जिल्ह्यातील ओबीसी-बहुजन समाजाच्या प्रमुख लोकांचा मेळावा पाचोरा येथे संपन्न झाला . त्यावेळी ओबीसी-बहुजन चळवळीत काम करणारे सर्व पक्षीय समाज बांधव उपस्थित होते. सुरवातीला सीमेवर शहीद झालेले शहीद जवान आणि महाराष्ट्राच्या आत्महत्या करणाऱ्या शेतकरी बांधवाना तसेच कोविड १९ या महामारीच्या आजारात मृत्यू पावलेल्या कोविड योध्यानां श्रध्दांजली वाहण्यात आली.

पुरोगामी विचारसरणीचे देशाचे नेते आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या नेतृत्वात व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री एकनाथराव खडसे नाथाभाऊ त्यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण राज्यभरात ओबीसीचे रद्द झालेले राजकीय आरक्षण बचाव जनसंपर्क अभियान सुरू करण्यात आले. या जनसंपर्क अभियान मेळाव्याचा प्रथम टप्पा जळगाव जिल्ह्यातून सुरू करण्यात आला. या जनसंपर्क अभियान मेळाव्याला जळगाव जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील व ग्रामीण भागातील सर्व नेते मंडळी व प्रमुख लोक उपस्थित होते. ओबीसी जनक्रांती परिषदचे संस्थापक अध्यक्ष श्री. अनिलभाऊ महाजन ह्या जनसंपर्क अभियान मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी होते. जनसंपर्क अभियान मेळाव्याचे प्रास्ताविक कैलास महाजन यांनी केले. यावेळी
ओबीसीचे रद्द झालेले राजकीय आरक्षण बचाव जनसंपर्क अभियान- मेळाव्याची भुमिका मान्यवरांना समजावून सांगितली. ओबीसी-बहुजन हिताचे अनेक विषयावर सविस्तर चर्चा करण्यात आली. उपस्थित असलेल्या सुनील शिंदे काँग्रेस तालुकाध्यक्ष सचिन सोमवंशी सर्व मान्यवर विचारवंतनी आपले विचार मांडून सदर जनसंपर्क अभियान मेळाव्यास मार्गदर्शन केले.

ओबीसीचे रद्द झालेले राजकीय आरक्षणच्या विषयावर सांगोपान चर्चा करण्यात आली व एकुण ०९ ते १० ठोस ठराव एक मताने मंजुर करण्यात आले आहेत. हे ठराव राज्य सरकारला व केंद्र सरकारकडे पुढील कार्यवाहीसाठी पाठविण्यात येणार आहेत.ओबीसी-बहुजन हा देशाचा श्वास आहे. ओबीसी-बहुजन वाचला तर देश वाचेल सर्वच राजकीय पक्षांमध्ये गेल्या ४० वर्षापासुन ओबीसी-बहुजन समाज बांधवांवर फार मोठ्या प्रमाणात अन्याय व उपेक्षा होत आहे. यासाठी ओबीसी जनक्रांती परिषद सनदशीर मार्गाने लढत आहे. ओबीसी-बहुजनाच्या सर्वांगीण सर्वकश विकासासाठी सदर परिषद सनदशीर मार्गाने अखेर पर्यंत लढत राहणार आहे.

राज्य सरकारने ओबीसी-बहुजनाच्या हितासाठी जास्तीत जास्त योजना लागू कराव्यात. ओबीसी-बहुजनाच्या हितासाठी जास्तीचा निधी राज्य व केंद्र सरकारने जाहीर करावा व ओबीसी-बहुजन समाजाला न्याय मिळण्यासाठी सर्व राजकीय पक्षांनी पक्षीय पातळीवर आपल्या पक्षामध्ये मंडल आयोग पूर्ण पणे लागू करावा केंद्र सरकारने ओबीसीची झालेली जनगणना जाहीर करावी ओबीसीचा इंपरील डेटा राज्यसरकार ला उपलब्ध करून द्यावा असे ओबीसी-बहुजन नेते अनिल भाऊ महाजन यांनी सांगितले. जिल्ह्यातील ओबीसी-बहुजन चळवळीत काम करणारे प्रमुख नेत्यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

सदर जनसंपर्क अभियान मेळाव्यास ओबीसी समाजातील माळी, धनगर वंजारी ,तेली ,तांबोळी, धोबी, परीट,सोनार,कुणबी या प्रमुख समाजातील लोकांची उपस्थिती होती.

१८ पगडजाती १२ बलुतेदार जळगाव जिल्ह्यातील व तालुक्यातील प्रमुख ओबीसी बहुजन समाज बांधव या जनसंपर्क अभियान मेळाव्यास उपस्थित होते.

अतिशय शिस्तबध्द पध्दतीने हि ओबीसी बैठक पार पडली सदर बैठक अतिशय खेळीमेळीचे वातावरणात संपन्न झाली.शेवटी राष्ट्रगीत घेऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.अनिल महाजन यांनी सर्वांचे आभार प्रकट केले.