के सी ई इंजिनीरिंग अँड मॅनेजमेन्ट महाविद्यालयातील विदयुत अभियांत्रिकी शाखेतर्फे सिलॅब आणि लॅटेक्स सॉफ्टवेअर वर कार्यशाळा
के सी ई इंजिनीरिंग अँड मॅनेजमेन्ट महाविद्यालयातील विदयुत अभियांत्रिकी शाखेतर्फे सिलॅब आणि लॅटेक्स सॉफ्टवेअर वर कार्यशाळा :—- के सी ई इंजिनीरिंग अँड मॅनेजमेन्ट महाविद्यालयाच्या स्पोकन ट्युटोरिअल अंतर्गत विदयुत अभियांत्रिकी शाखेतर्फे तृतीय आणि अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांसाठी तीस दिवसीय लॅटेक्स आणि सिलॅब या विषयावर कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते . भारत सरकारच्या मानव संसाधन विकास मंत्रालयांतर्गत व आयआयटी मुबईच्या संयुक्त विद्यमाने हि कार्यशाळा आयोजित करून सॉफ्टवेअर ची अद्ययावत माहिती विद्यार्थ्यांना व्हावी हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून १८१ विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदविला . या ऑनलाईन कार्यशाळेत सिलॅब आणि लॅटेक्स सॉफ्टवेअर चा कसा उपयोग करावा या बद्दल सखोल मार्गदर्शन करण्यात आले . तसेच कोडिंग भाषेचा उपयोग करून विविध प्रकारची नवनवीन सॉफ्टवेअर कसे तयार करावेत या बद्दलची माहिती विद्यार्थ्यांना प्राप्त झाली .विद्यार्थ्यांनी ओपन फ्री सॉफ्टवेअर चा उपयोग जास्तीत जास्त करावा असे आव्हान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ संजय सुगंधी यांनी केले आहेत . या कार्यक्रमासाठी विभाग प्रमुख प्रा . प्रसाद कुलकर्णी यांचे सहकार्य लाभले . एफ ओ ओ एस सेंटरचे समन्वयक प्रा . अविनाश सूर्यवंशी, वर्कशॉप कोऑर्डिनटोर प्रा . रुची गुल्हाने यांनी कार्यशाळेचे आयोजन केले.