शिंदे इंटरनॅशनल स्कूल CBSE पाचोरा 10th Board शंभर टक्के निकालाची परंपरा कायम

शिंदे इंटरनॅशनल स्कूल CBSE पाचोरा 10th Board शंभर टक्के निकालाची परंपरा कायम

गिरनाई शिक्षण संस्था संचालित शिंदे इंटरनॅशनल स्कूल सीबीएससी बोर्ड2023-24 चा दहावीचा निकाल नुकताच जाहीर करण्यात आला. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी इ.दहावीच्या विद्यार्थांनी शंभर टक्के निकालाची परंपरा कायम ठेवीत सर्व विद्यार्थ्यांना घवघवीत यश मिळालेले आहे .

School मधून या वर्षी एकूण *84* विद्यार्थी परीक्षेस बसले होते त्यापैकी *सर्वच 84 विद्यार्थी उत्तीर्ण* झालेले असून त्यात *I)इंद्रनील प्रवीण पवार- 96/*

*II) पलक पियूष झवर-94.4/*

*III) वैदेही दिनेश झवर -94.2/*

*IV) श्याम उमेश शामनानी -91.2/*

*V) दिव्यांका निलेश अग्रवाल 90.4/*

V) पुष्कर सतिष पाटील-90.4/अशा घवघवीत गुणांनी उत्तीर्ण झालेले असून संस्थेसाठी अभिमानाची बाब म्हणजे इंद्रनील प्रवीण पवार हा विद्यार्थी पाचोरा तालुक्यातून प्रथम* आलेला आहे. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे संस्थापकीय अध्यक्ष मा. तात्यासाहेब पंडितराव शिंदे*, *भाजपा युवा नेते अमोल भाऊ शिंदे, आदर्श विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ पूजा ताई शिंदे,* *संस्थेचे सचिव ॲड. जे.डी. काटकर* , *उपाध्यक्ष निरज मूनोत*, *सहसचिव प्रा. शिवाजी शिंदे सर*, *प्राचार्य डॉ. विजय पाटील सर* , *शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले व पुढील वाटचालीसाठी विद्यार्थ्यांनाशुभेच्छा दिल्या .