शिवसेना-उबाठाकडे महिलांचा वाढता कल : वैशालीताई सुर्यवंशी कजगाव-वाडे गटात मशालचा झंझावात; शाखांचा शुभारंभ

शिवसेना-उबाठाकडे महिलांचा वाढता कल : वैशालीताई सुर्यवंशी
कजगाव-वाडे गटात मशालचा झंझावात; शाखांचा शुभारंभ

भडगाव, दिनांक १३ (प्रतिनिधी ) : आचारसंहिता लागण्याच्या आधी भडगाव तालुक्यातील उर्वरित गावांमध्ये शाखांचा शुभारंभ करण्याचा आमचा संकल्प असून मतदारसंघातून पुरूषांच्या सोबतीने महिलांचा सुध्दा आम्हाला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत असल्याचे प्रतिपादन शिवसेना-उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्या वैशालीताई सुर्यवंशी यांनी केले. त्या तालुक्यातील कजगाव-वाडे गटातील शिवसेना शाखांच्या शुभारंभ प्रसंगी बोलत होत्या.

या संदर्भातील वृत्त असे की, शिवसेना-उबाठा पक्षाच्या नेत्या वैशालीताई नरेंद्रसिंग सुर्यवंशी यांनी ‘गाव तिथे शाखा’ हा उपक्रम सुरू केला असून यात पाचोरा आणि भडगाव तालुक्यातील प्रत्येक गावात पक्षाची शाखा सुरू करण्यात येत आहे. आज या उपक्रमाच्या अंतर्गत सकाळी भडगाव तालुक्यातील कनाशी, वाडे. बांबरूड, गोंडगाव, घुसर्डी, सावदे, लोण, बोरनार, बोदर्डे व निंभोरा या गावांमध्ये शिवसेना शाखांचा शुभारंभ करण्यात आला.

यातील प्रत्येक गावांमध्ये वैशालीताई नरेंद्रसिंग सुर्यवंशी यांचे ढोल-ताशांच्या गजरात आणि जोरदार जयघोषणात स्वागत करण्यात आले. प्रत्येक शाखेच्या फलकाचे पूजन करून या फलकाचे अनावरण करण्यात आले. याप्रसंगी जोरदार जयघोषणांनी परिसर दुमदुमल्याचे दिसून आले.

यात गोंडगाव येथे उपस्थितांशी संवाद साधतांना वैशालीताई म्हणाल्या की, गाव तिथे शाखा या उपक्रमाला मतदारसंघातून अतिशय उत्स्फुर्त असा प्रतिसाद लाभत आहे. आपल्या मतदारसंघासह संपूर्ण राज्यात उध्दव साहेब ठाकरे यांच्याबाबत असणारी सहानुभूती ही प्रामुख्याने आम्ही अनुभवत आहोत. आगामी निवडणुकीत जनता ही नक्कीच आमच्या सोबत असेल असा आशावाद त्यांनी व्यक्त केला. तर आपण विधानसभाच लढविणार असून पक्षाने लोकसभेसाठी दिलेल्या उमेदवाराचा हिरीरीने प्रचार करणार असल्याचे देखील त्यांनी आवर्जून नमूद केले.

दरम्यान, गोंडगाव येथेच बोलतांना योजनाताई पाटील यांनी भडगाव तालुक्यातील जनता या वैशालीताई यांच्या पाठीशी खंबीरपणे उभ्या राहून त्यांना आमदार बनवणारच असे सांगितले. या शाखा उदघाटनाच्या कार्यक्रमाला वैशालीताई नरेंद्रसिंग सुर्यवंशी यांच्यासोबत गणेश परदेशी, प्रशांत पवार, मनोहर चौधरी, शंकर मारवाडी, योजना ताई पाटील, एडवोकेट प्रवीण पाटील, जेके पाटील, चेतन पाटील, माधव जगताप, बाळू अण्णा, भालचंद्र पाटील, अरुण पाटील, गोरख दादा पाटील, विजय साळुंखे, रतन परदेशी, राजेंद्र परदेशी, अशोक माळी, अण्णा चौधरी, शांताराम पाटील, अण्णा महाजन, गोपाल महाजन, दत्तू मांडोळे, श्याम पाटील, संजय बळीराम पाटील, शुभम पाटील, वाल्मीक पाटील, आदी मान्यवरांची उपस्थिती होती.