चोपडा महाविद्यालयात ‘वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ’ उत्साहात संपन्न

चोपडा महाविद्यालयात ‘वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ’ उत्साहात संपन्न

चोपडा:येथील महात्मा गांधी शिक्षण मंडळाचे दादासाहेब डॉ.सुरेश जी.पाटील महाविद्यालयात दि.१४ फेब्रुवारी २०२४ रोजी ‘वार्षिक पारितोषिक वितरण समारंभाचे’ आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाची सुरुवात माजी शिक्षणमंत्री कै. ना.अक्कासो सौ. शरच्चंद्रिका सुरेश पाटील व संस्थेचे संस्थापक अध्यक्ष कै.ना.दादासाहेब डॉ. सुरेश जी.पाटील यांच्या प्रतिमेला मान्यवरांच्या हस्ते माल्यार्पण करून तसेच दीपप्रज्वलन करून करण्यात आली. या कार्यक्रमाच्या सुरुवातीला संगीत विभागातील विद्यार्थ्यांनी स्वागत गीत सादर केले.
या कार्यक्रमाला महात्मा गांधी शिक्षण मंडळाचे अध्यक्ष ॲड. संदीप सुरेश पाटील व संस्थेच्या सचिव डॉ.सौ.स्मिताताई संदीप पाटील यांनी शुभेच्छा दिल्या व सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे कौतुक केले. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगावचे कुलसचिव डॉ.विनोद प्रभाकर पाटील हे उपस्थित होते तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी.ए. सूर्यवंशी हे उपस्थित होते.
या कार्यक्रमाप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून कार्यकारी मंडळ सदस्य बाजीराव वामन पाटील, नियामक मंडळाचे सदस्य यशवंत दोधु खैरनार, महाविद्यालय विकास समितीचे सदस्य विश्वनाथ अग्रवाल, नियामक मंडळ सदस्य नंदलाल जगन्नाथ शिंदे, माजी संचालक ग.स. सोसायटी जळगांवचे रमेश एकनाथ शिंदे, सेवानिवृत्त मुख्याध्यापक मधुकर विठ्ठल बाविस्कर, जळगांव येथील जनसेवक अनिल वसंत वर्मा, महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा.डॉ.ए.एल.चौधरी, समन्वयक डॉ. एस. ए. वाघ, उपप्राचार्य एस.पी.पाटील, पर्यवेक्षक ए. एन. बोरसे, समन्वयक पी.एस. पाडवी तसेच महाविद्यालयाचे रजिस्ट्रार डी.एम.पाटील आदि मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व वार्षिक अहवाल वाचन वार्षिक पारितोषिक वितरण समारंभाचे प्रमुख प्रा.डॉ. बी.एम. सपकाळ यांनी केले. यावेळी त्यांनी आपल्या अहवाल वाचनात महाविद्यालयात घेण्यात येणाऱ्या विविध कार्यक्रमाविषयी, महाविद्यालयातील विविध सोयी सुविधांविषयी, महाविद्यालयात चालवले जाणारे विविध उपक्रम जसे की, पालक-शिक्षक उपक्रम, केक-फ्री कॅम्पस, वाचन संस्कृती अभियान महाविद्यालयाच्या यशाच्या शिखरावरचा चढता आलेख आपल्या अहवाल स्वरूपात सादर केला. याप्रसंगी प्रमुख पाहुण्यांचा परिचय समन्वयक डॉ.एस.ए.वाघ यांनी करून दिला.
या कार्यक्रमाप्रसंगी प्रमुख पाहुणे कवयित्री बहिणाबाई कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगावचे कुलसचिव डॉ.विनोद प्रभाकर पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त करतांना महाविद्यालयाचा परिसर व विद्यार्थी, प्राध्यापकांच्या कामगिरीचे त्यांनी कौतुक केले.यावेळी ते विद्यार्थ्यांना संदेश देतांना म्हणाले की, ‘अपयश ही आपल्या यशाची पहिली पायरी असून ज्यांना पारितोषिक मिळाले नाही त्यांनी खचून न जाता आयुष्यात खूप काही करायचे आहे हीच आशा बाळगून भविष्याची वाटचाल करीत राहिले पाहिजे’.यावेळी त्यांनी राष्ट्रीय शैक्षणिक धोरणावर देखील मार्गदर्शन केले व विद्यार्थ्यांना समाजातील विविध क्षेत्रात अग्रेसर असलेल्या व्यक्तींचे उदाहरण देऊन प्रोत्साहित केले. गुणवंत विद्यार्थ्यांचे कौतुक करून त्यांना शुभेच्छा दिल्या.
या कार्यक्रमाप्रसंगी सन २०२३-२४ या शैक्षणिक वर्षातील विविध खेळ, क्रीडा, युवारंग, विविध क्षेत्रातील कलागुण, राष्ट्रीय सेवा योजना, एनसीसी विभाग व संपूर्ण शैक्षणिक वर्षात विशेष प्राविण्य मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांचा स्मृतिचिन्ह, सन्मानपत्र व रोख रक्कम बक्षीस देऊन जवळपास १००हून अधिक विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले.त्याचप्रमाणे जळगाव येथील जनसेवक अनिल वसंत वर्मा यांना संस्थेतर्फे गौरवपत्र देऊन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. या गौरव पत्राचे वाचन समन्वयक डॉ. एस.ए.वाघ यांनी केले.
या कार्यक्रमाचे अध्यक्षीय मनोगत व्यक्त करतांना प्राचार्य डॉ.डी.ए.सूर्यवंशी म्हणाले की, ‘परीक्षा हे तंत्र आहे ते आत्मसात करण्यासाठी अभ्यास, जिद्द व चिकाटी हे गुण विद्यार्थ्यांच्या अंगी असणे आवश्यक आहे. भविष्यात विद्यार्थ्यांना अनेक संधी उपलब्ध आहेत. त्याचा फायदा विद्यार्थ्यांनी घ्यायला हवा’. यावेळी त्यांनी संस्थेबद्दल असलेले प्रेम व जिव्हाळा आपल्या मनोगतातून व्यक्त केला.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन डॉ. मधुचंद्र एल. भुसारे व संदीप बी. देवरे यांनी केले तर आभार कनिष्ठ विभागाचे वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ प्रमुख एन.बी.शिरसाठ यांनी मानले.
या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डॉ. व्ही. आर.हुसे, एम.ए.पाटील, डॉ.व्ही.आर.कांबळे, डॉ.सौ.के.एस.क्षिरसागर, डॉ.आर.आर.पाटील, डॉ.ए.एच.साळुंखे, व्ही.पी.हौसे, डॉ.डी.डी.कर्दपवार, डी.एस.पाटील, व्ही.डी.शिंदे, डॉ.ए.एच.साळुंखे, वाय.एन.पाटील, डॉ.एन.सी.पाटील, एस.जी. पाटील, निवृत्ती बी. पाटील, जी.बी.बडगुजर तसेच महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक व कर्मचारी बंधू -भगिनी यांनी सहकार्य केले.
या कार्यक्रमाप्रसंगी बहुसंख्य विद्यार्थी, पालक, शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी बंधू-भगिनी उपस्थित होते.