एम. एम. महाविद्यालयात अभ्यासक्रम पुनर्रचना कार्यशाळा संपन्न

पाचोरा (प्रतिनिधी)
पाचोरा येथे कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव व श्री शेठ मुरलीधरजी मानसिंगका साहित्य, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय पाचोरा यांच्या संयुक्त विद्यमाने पदव्युत्तर इतिहास विभागाच्या व्दारे आयोजित एक दिवसीय द्वितीय वर्ष एम ए इतिहास या वर्गाची अभ्यासक्रम पुनर्रचना कार्यशाळा संपन्न झाली. या कार्यशाळेचे उद्घाटन पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्थेचे व्हा.चेअरमन व क.ब.चौ.उ.म विद्यापीठ चे सिनेट सदस्य व्ही. टी जोशी यानी केले. त्यांनी शासनाचे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 या विषयी सखोल माहिती दिली या कार्यशाळेच्या उद्घाटन सत्राचे अधक्ष माजी प्राचार्य डॉ बी एन पाटील होते त्यांनी सर्वांना मार्गदर्शन केले,महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ शिरीष पाटील यांनी इतिहास विषयातील संशोधन आणि लेखन यावर मार्गदर्शन केले यावेळी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ जे व्ही पाटील,प्रा.एस टी सूर्यवंशी उपस्थित होते या कार्यशाळेत एम जे महाविद्यालयातून डॉ उज्वला भिरुड,डॉ जुगलकिशोर दुबे,डॉ पंकज कुमार प्रेमसागर भुसावळ,डॉ सुनील पाटील नगाव,डॉ जी एन पाटील नगाव,डॉ अमृत वळवी, डॉ राजविरेंद्रसिंग गावित धुळे,डॉ ए एम देशमुख शिरपूर,प्रा.व्ही आर सोनार,डॉ व्ही एल चव्हाण शिरपूर,मनीषा वर्मा शिरपूर, डॉ.बी एल पावरा,डॉ.एन एस पठाण,डॉ विजय देसले साक्री,प्रा.जयसिंग पराडके नंदुरबार,डॉ चित्रा पाटील,डॉ इंदिरा लोखंडे भडगाव,डॉ. इंगोले पी ओ नाहटा कॉलेज भुसावळ,डॉ दीपक शिरसाठ महिला कॉलेज जळगांव,डॉ मंजुश्री जाधव,डॉ एस बी तडवी डॉ शरद पाटील,प्रा.अमित गायकवाड,श्री रवी कदम,भिला पवार,जयेश कुमावत,जावेद देशमुख आदी सर्वांनी उपस्थित राहून कार्यशाळेत सक्रिय सहभाग घेतला दोन सत्रात ही कार्यशाळा संपन्न झाली प्रथम सत्रात क ब चौ उ म विद्यापीठ इतिहास अभ्यास मंडळाचे चेअरमन डॉ प्रशांत देशमुख यांनी झूम मीटिंग व्दारे सर्वांना NEP 2020 व पदव्युत्तर वर्गाचा अभ्यासक्रम कसा असावा याविषयी सखोल मार्गदर्शन केले.समारोप सत्राचे अध्यक्ष प्राचार्य डॉ शिरीष पाटील होते.प्रास्ताविक इतिहास विभागप्रमुख डॉ जे डी गोपाळ यांनी केले सुत्रसंचलन डॉ माणिक पाटील यांनी तर आभार डॉ के एस इंगळे यांनी मानले या कार्यशाळेत अभ्यास मंडळाचे सर्व सदस्य या कार्यशाळेत एकूण 15 पेपर्सचा अभ्यासक्रम पुनर्रचना करण्यात आली.या कार्यशाळेचे संयोजक डॉ जे डी गोपाळ तर समन्वयक डॉ माणिक पाटील होते.