Pro- Active Abacus Ltd.kolhapur आयोजित नॅशनल अबॅकस स्पर्धेमध्ये पाचोरा आणि भडगावच्या श्री समर्थ आणि सक्षम प्रोऍक्टिव्ह अबॅकस, वेदिक मॅथ क्लासेस चे घवघवीत यश
पुणे येथे 4 फेब्रुवारी रोजी पार पडलेल्या प्रोऍक्टिव्ह अबॅकस नॅशनल लेव्हल कॉम्पिटिशन 2023 या स्पर्धेमध्ये श्री समर्थ आणि सक्षम प्रोऍक्टिव्ह अबॅकस क्लासेस चे 16 विद्यार्थी भारतातून ट्रॉफी विनर ठरले. 6 मिनिटांत 100 गणिते सोडविणे असे या स्पर्धेचे स्वरूप होते. धुळे येथे विभागस्तरीय झालेल्या कॉम्पिटिशन मध्ये पाचोरा आणि भडगावच्या क्लास मधील 19 विद्यार्थ्यांची नॅशनल लेव्हलसाठी निवड झाली होती. @ या स्पर्धेत-भारतातून क्लासमधील खालील विद्यार्थ्यानी यश संपादन केले. भुवनेश सचिन पाटील ( क्रमांक- सहावा ), निर्मिती महेंद्र पाटील ( क्रमांक- आठवा ), तेजिनिधी शिवाजी सावंत ( क्रमांक- दहावा) तसेच तन्मय राजेंद्र पाटील, राधिका धरमसिंग परदेशी, सृष्टी प्रवीण ब्राह्मणे, सय्यम कमलेश सुराणा, कल्पेश चुडामन पुजारी, वेदांत अमोल पाटील, दिव्यांशु हरी चौधरी, वेदांत प्रकाश चौधरी, ओवी वैभव दीक्षित, धैर्य संतोष जोशी, तनिष्का कपिल राऊळ, आर्यन अनिल सिनकर, हार्दिक अमित पवार ( उत्तेजनार्थ – finalist) हे विद्यार्थी विजेतेपदाचे मानकरी ठरले. तसेच क्लास च्या मास्टर ट्रेनर यांना बेस्ट कोऑर्डिनेटर या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. या स्पर्धेत भारतातील 750 Abacus centre मधील 2200 स्पर्धकांनी भाग घेतला होता.
सदर कार्यक्रमास श्री राजेंद्र लोचानी,स्नेहा लोचानी ,गिरीष करडे सर, श्री अजय मणियार सर, सारिका करडे मॅडम, तेजस्विनी सावंत मॅडम डायरेक्टर प्रोऍक्टिव्ह अबॅकस मुंबई हे उपस्थित होते.
विद्यार्थ्यांना श्री समर्थ प्रो ॲक्टिव्ह अबॅकस आणि सक्षम प्रोऍक्टिव्ह अबॅकसचे मास्टर ट्रेनर श्री रविंद्र पाटील सर आणि सपना शिंदे मॅडम यांचे अनमोल मार्गदर्शन लाभले. या यशाबद्दल पालकांकडुंन सर्व विद्यार्थ्यांचे कौतुक केले गेले. अधिक माहितीसाठी संपर्क- 7507277008 ( रविंद्र पाटील सर , सपना शिंदे मॅडम @ पत्ता- श्री समर्थ प्रो ॲक्टिव्ह अबॅकस , कैलास नगर,पाचोरा आणि सक्षम प्रो ॲक्टिव्ह अबॅकस-एकवीरा नगर, बाळद रोड, भडगाव)