श्री.गो.से.हायस्कूल, पाचोरा येथे “शाळा प्रवेशोत्सव” उत्साहात साजरा
पा.ता.सह शिक्षण संस्थेच्या श्री.गो.से. हायस्कूल येथे शासनाणे निर्देशित केल्याप्रमाणे आज दिनांक 15 /6 /2026 सोमवार रोजी “शाळा प्रवेशोत्सव” पी.टी.सी.संस्थेचे अध्यक्ष आदरणीय भाऊसो. दिलीप ओंकार वाघ यांच्या अध्यक्षतेखाली सकाळी 8 वाजता संपन्न झाला.
शाळा प्रवेशोत्सव कार्यक्रमासाठी व्यासपीठावर संस्थेचे चेअरमन नानासो.श्री. संजय ओंकार वाघ, शालेय समिती चेअरमन दादासो.श्री. खलील देशमुख,तांत्रिक विभाग चेअरमन अण्णासो.श्री. वासुदेव महाजन,तांत्रिक विभाग सदस्य बापूसो.श्री. प्रकाश एकनाथ पाटील,आबासो. श्री.भागवत एकनाथ महालपुरे, ताईसो. सौ जिजाबाई अभिमन्यू पाटील,विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. एन.आर.पाटील,उपमुख्याध्यापक श्री.आर.एल. पाटील,केंद्रप्रमुख श्री.अभिजीत खैरनार पर्यवेक्षक सौ.ए.आर गोहिल मॅम, श्री.राजेश बांठिया,श्री. महेश कौंडिण्य उपस्थित होते
शाळेच्या पहिल्याच दिवशी इयत्ता 5वी च्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते गुलाब पुष्प व पाठ्यपुस्तकांचे वाटप करण्यात आले
कार्यक्रमाची सुरुवात ईशस्तवन व स्वागत गीताने संगीत शिक्षक श्री.सागर थोरात व रुपेश पाटील यांनी केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सांस्कृतिक विभाग प्रमुख श्री. आर.बी.बोरसे तर आभार प्रदर्शन श्री.एस.एल. वाघ सर यांनी केले. कार्यक्रमास शाळेतील सर्व शिक्षक बंधू-भगिनी,शिक्षकेतर कर्मचारी व पालक वर्ग उपस्थित होते.कार्यक्रम संपल्यानंतर विद्यार्थी व पालकांना अल्पोपहार व चहापानाची व्यवस्था करण्यात आली
शालेय समिती चे चेअरमन दादासो. श्री. खलील देशमुख यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात विद्यार्थी व पालकांना नवीन शैक्षणिक वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या.✨✨✨.























