आखेर उपोषण केल्याची प्रशासन कडून दखल लवकर मागणी पुर्ण होणार म.न.से चे प्रशांत पाटील यांची माहिती

( पाचोरा प्रतिनिधी )

पाचोरा नगर परिषद च्या मुख्याधिकारी यांना वारंवार तक्रार अर्ज करून सुद्धा प्रभाग क्रमांक तीन मधील मूलभूत सुविधा गटारी रस्ते व स्वच्छता ची कामे झालेली नाहीत त्यामुळे स्थानिक नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे गेल्या काही महिन्यांपूर्वी त्र्यंबक नगर मध्ये एका ठिकाणी गटारीचे काम करण्यात आले होते पहिल्याच पावसात पूर्ण गटार जमीनदोस्त झालेली आहे निकृष्ट दर्जाचे झालेले काम याकडे प्रशासन जाणीवपूर्वक दुर्लक्ष देत आहे प्रशासनाने झालेल्या कामाची चौकशी करावी सोबतच नवीन गटारी आणि रस्त्यांचे कामाकडे लक्ष द्यावे त्यासाठी मनसेचे प्रशांत पाटील यांच्या नेतृत्वात दिनांक 5 ऑक्टोंबर पासून आमरण उपोषण सुरू केले होते.
गेली वीस वर्षे झाली कृष्णापुरी त्रंबक नगर भैरव नगर मधील काही रहिवासी नगरपालिकेचा कर हा वेळेवर भरतात. आज कराची रक्कम वीस वर्षांमध्ये एवढी झालेली आहे की या भागातील रहिवासी स्वखर्चातून मूलभूत गरज जसे गटारी वर असते ते नक्कीच करू शकले असते पण गेल्या वीस वर्षांमध्ये त्र्यंबक नगर मध्ये ना रस्ता झाला गटारी झाल्या भुयारी गटारी आहे ते रस्ते सुद्धा करून ठेवले आहे भुयारी गटारी चे काम कॉन्ट्रॅक्टरने पूर्ण केलेले नाही. त्या भागातील काही दिवसांपूर्वी बनविण्यात आलेली घटना पावसाच्या पाण्यात जमीनदोस्त झालेली आहे
यासंदर्भात नगरपालिकेला 15 सप्टेंबर रोजी तक्रार अर्ज दाखल केला होता नगरपालिकेकडून व बांधकाम विभागाकडून या अर्जाची कोणत्याही प्रकारे दखल घेतली नाही त्यासाठी नगरपालिकेला प्रशांत पाटील यांनी दोन स्मरण पत्र दिले होते तरीसुद्धा नगरपालिका मुख्याधिकारी व बांधकाम विभाग यांच्याकडून कोणत्याही प्रकारची दखल घेण्यात आलेली नाही तक्रार अर्ज आणि स्मरण पत्र देऊनही जनसामान्यांच्या मूलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी प्रशासनाला जाग येत नसल्याने दिनांक 5 ऑक्टोंबर पासून प्रशांत पाटील यांच्यासह प्रभाग क्रमांक तीन मधील नागरिकांनी पाचोरा तहसील आवारात नगरपरिषद विरोधात आमरण उपोषण सुरू केले आहे

उपोषण स्थळी दुसऱ्या दिवशी नगरपरिषदेच्या वतीने उपमुख्याधिकारी मराठे, प्रशासकीय अधिकारी प्रकाश भोसले इंजिनियर सूर्यवंशी, पा.न. उपनगराध्य व शिवसेचे मुकुंद बिलदीकर,किशोर बारवकर, बापु हटकर, ,उपोषण कर्ता यांची भेट घेऊन आपल्या मूलभूत मागण्या लवकर पूर्ण होतील व येणाऱ्या 10 दिवसात गटारीचे काम सुरू करू व 1 नोव्हेंबरला प्रभाग क्र 3 मधील सर्व सस्त्यांचे काम सुरू करू प्रभागातील समस्यांन बाबत एक तास चर्चा करण्यात आली त्यानंतर अशी लेखी आश्वासने देवून त्यांना विनंती करण्यात आली तरी आपण उपोषण स्थगित करावे मनसेचे प्रशांत पाटील यांनी लेखी घेऊन उपोषण तात्पुरता स्थगित केले आहे.

प्रशांत पाटील यांच्याशी बोलताना त्यांनी सांगितले की
आमच्या सर्व मागण्या मान्य झाल्या असून आम्ही आमरण उपोषणाला तात्पुरता स्थगिती दिली आहे.

हे यश माझे एकट्याचे नसून माझ्या पाठीशी खंबीपणे उभे असणारे प्रभाग क्र.3 मधील सर्व नागरिकांचे आहे त्याच सोबत मनसे चे विनय भोईटे साहेब व रावसाहेब कदम साहेब,अनिल वाघ,शेखरदादा पाटील,शुभम पाटील,ज्ञानेश्वर ठाकरे, जितेंद्र नाईक,शांताराम बोरसे ,श्याम राजपूत, कमलेश सोनार ऋषिकेश भोई,अनिल पाथरवट, सचिन पाटील. मनसे सर्व कार्यकर्ते मोलाची साथ दिली.