एस.एस.सी.परीक्षेत श्री.गो.से.हायस्कूलचे उत्तुंग यश ९४.६ टक्के गुणांसह ललित आंबेकर विद्यालयातून प्रथम
पाचोरा – पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्था संचलित श्री.गो.से.हायस्कूलने एसएससी परीक्षेत उत्तम यश प्राप्त केले असून विद्यालयाचा ८७.२० एवढा निकाल जाहीर झाला आहे. विद्यालयातील प्रविष्ट झालेले ४६१ विद्यार्थ्यांपैकी ४०२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून ८१ विद्यार्थ्यांनी विशेष प्राविण्यसह घवघवीत यश प्राप्त केलेले आहे. प्रथम पाच विद्यार्थी पुढील प्रमाणे-
प्रथम- ललित बळवंत आंबेकर – ९४.६ द्वितीय- हर्षल शैलेंद्र चौधरी ९३.४० तृतीय- मोहित गणेश पाटील- ९२
चतुर्थ – स्वरूप अशोक राठोड-९१
पाचवा – खुशी मनोहर सोनवणे-९०
सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे आणि पालकांचे संस्थेचे अध्यक्ष माजी आमदार भाऊसो.दिलीप ओंकार वाघ,चेअरमन नानासो संजय ओंकार वाघ, मानस सचिव दादासो. ॲड.महेश देशमुख, व्हॉइस चेअरमन नानासो. व्ही. टी.जोशी, शालेय समिती चेअरमन दादासो.खलील देशमुख, तांत्रिक विभाग चेअरमन अण्णासो.वासुदेव महाजन यांचेसह मुख्याध्यापक श्री.एन.आर.पाटील(ठाकरे), उपमुख्याध्यापक श्री.आर.एल.पाटील, पर्यवेक्षिका सौ.ए.आर.गोहिल, पर्यवेक्षक श्री.आर.बी.बांठिया, पर्यवेक्षक श्री. महेश कौंडिण्य, किमान कौशल्य विभाग प्रमुख श्री.मनीष बाविस्कर, कार्यालयीन प्रमुख श्री.अजय सिनकर तसेच सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे.

























