कासार पिंपळगाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक रामदास एकनाथ मचे सर यांचा सेवापुर्ती सन्मान सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न

(सुनिल नजन “चिफब्युरो” स्पेशल क्राईम रिपोर्टर अहिल्यानगर जिल्हा)
मोहोज खुर्द, तालुका पाथर्डी जिल्हा अहिल्यानगर येथील रहिवासी असलेले आणि कासार पिंपळगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत मुख्याध्यापक म्हणून सेवेत असलेले रामदास एकनाथ मचे सर यांचा वयाच्या ५८ वर्षाच्या प्रदिर्घ सेवेनंतर सेवापुर्ती सन्मान सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी सरपंच सौ मोनालीताई राहुल राजळे या होत्या.तर प्रमुख पाहुणे म्हणून शेवगाव-पाथर्डी विधानसभा मतदारसंघाच्या भाजपच्या हॅट्ट्रिक आमदार मोनिकाताई राजळे या होत्या. मचे सर हे मुख्याध्यापक म्हणून तिन वर्षांपूर्वी कासार पिंपळगाव येथे बदलुन आल्या नंतर त्यांनी प्राथमिक शाळेचा चेहरा मोहराच बदलून टाकला आहे.अत्यंत शांत आणि संयमी व्यक्तीमत्व म्हणून मचे सरांचे सर्व उपस्थितांनी टाळ्यांच्या गजरात कौतुक केले.प्रारंभी आमदार मोनिकाताई राजळे यांच्या हस्ते सरस्वती मातेच्या प्रतिमेच्या पूजना नंतर दीपप्रज्वलन करण्यात आले. सौभाग्यवती मुक्ताबाई रामदास मचे आणि रामदास एकनाथ मचे सर यांचा आमदार राजळे यांनी सपत्नीक सत्कार केला व सुबेच्छा देउन त्या लगेचच पुढील कार्यक्रमा साठी रवाना झाल्या. सुरुवातीला प्रास्ताविक तुषार तुपे गुरुजी यांनी केले.नंतर एक शालेय विद्यार्थीनी तेजल तिजोरे हिने छोटेखानी भाषण केले.नंतर केंद्र प्रमुख सुभाष सोनवणे सर,मचे सरांची मुलगी कांचन मचे,पाथर्डी पंचायत समितीचे विस्तार अधिकारी अनिल भवार साहेब,निवृत्त मुख्याध्यापक कुंडलिक मचे सर, हनुमान टाकळी शाळेचे मुख्याध्यापक तुळशिदास खेडकर, भालगावचे रहिवासी आणि आता मंचरच्या अवसरी विद्यालयाचे प्राचार्य जगन्नाथ सुपेकर सर,ह.भ.प. श्रीराम महाराज मचे,आणि कासार पिंपळगावच्या माजी सरपंच सौ मोनालीताई राहुल राजळे, यांनी आपले विचार व्यक्त केले.त्यांनी मचे सर यांच्या कार्याचा गौरव केला.सत्काराला उत्तर देताना रामदास मचे सर म्हणाले की मी मुख्याध्यापक होतो.त्यामुळे शाळेत शिकवत नव्हतो तरीही या शाळेतील विद्यार्थ्यांनी माझ्या वर जे प्रेम केलं ते मी आयुष्यभर कधीही विसरणार नाही.मी वयाची ५८ वर्षे सेवा केल्या नंतर निवृत्त होत आहे. पण निवृत्ती नंतरही शिक्षणासाठी, समाजासाठी मला जे समाजकार्य करता येईल ते मी निश्चित करणार आहे.कासार पिंपळगाव येथील ग्रामस्थ व प्राथमिक शाळेच्या वतीने माझा जो सन्मान केला त्या बद्दल मी सर्वाचा आभारी आहे असे मचे सर यांनी सांगितले.या कार्यक्रमासाठी वृद्धेश्वर साखर कारखान्याचे संचालक साहेबराव सातपुते, कुंडलिक मचे सर, गोरक्षनाथ राजळे सर,बाळासाहेब भिसे,राजळे महा विद्यालयाचे प्राध्यापक काळे सर,खाडे सर, जवखेडे विद्यालयाचे मुख्याध्यापक संपत वांढेकर सर,मनोहर कराळे सर, बाबासाहेब मचे, सुभाष डोळसे, चितळीच्या हेडमास्तर संगिता बडे,हत्राळ शाळेचे मुख्याध्यापक बटुळे सर,भालगावचा सुपेकर परीवार,पठाडे सर,अप्पासाहेब राजळे,मनिषा ढोले,मीना देवढे, वनिता बलफे, उद्धव दौंड, कांचन मचे आणि भाग्यश्री मचे, कांबळे मॅडम, सय्यद मॅडम,तुपे मॅडम,बेरड मॅडम, गोसावी सर, जवखेडे खालसा येथील राजेंद्र मतकर सर, राधाकिसन जाधव सर, शिवाजी वाघमारे, संदिप म्हस्के, विनायक म्हस्के इत्यादी मान्यवर उपस्थित होते. गणेश कांबळे सर यांनी रेखाटलेले सेवापुर्तीचे रांगोळी चित्र सर्वांचे लक्ष वेधून घेत होते.सुत्रसंचालन ज्योती आधाट व महादेव कौंसे सर यांनी केले तर आभार बाळासाहेब माने यांनी मानले.प्रिती भोजनानंतर या सोहळ्याची सांगता झाली.कासार पिंपळगाव शाळा व्यवस्थापन समिती,माजी विद्यार्थी संघ, ग्रामपंचायत, सोसायटीचे सर्व पदाधिकारी, शिक्षक व विद्यार्थी तसेच इतर शाळेचे शिक्षक शिक्षिका मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
























