राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले आणि विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंतीनिमित्त पाचोऱ्यात सुप्रसिद्ध सिनेगीत गायक आनंद शिंदे यांच्या “भिमगीतांचा झंकार (ऑर्केस्ट्रा)”
( पाचोरा प्रतिनिधी )
पाचोरा : राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले आणि विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंतीनिमित्त पाचोरा-भडगाव तालुका सार्वजनिक जयंती उत्सव समितीच्या वतीने भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या निमित्ताने महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध सिनेगीत गायक आनंद शिंदे यांच्या “भिमगीतांचा झंकार (ऑर्केस्ट्रा)” या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
हा कार्यक्रम शनिवार, दि. २५ एप्रिल २०२६ रोजी सायं. ७.०० वाजता पाचोरा बस स्थानकाजवळ, नागसेन नगर, पाचोरा येथे पार पडणार आहे.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पाचोरा-भडगावचे आमदार मा. किशोरआप्पा पाटील हे राहणार असून, विशेष सहकार्य मा. मनोज शांताराम पाटील (संचालक, एम.एस.पी. बिल्डकॉन) यांचे लाभणार आहे.
या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून मा. सौ. सुनिताताई पाटील (नगराध्यक्ष, न.पा. पाचोरा), मा. सागर पवार (गीतकार, मुंबई), मा. बापू राठोड (उपविभागीय पोलीस अधिकारी, पाचोरा), मा. मंगेश देवरे (मुख्याधिकारी, न.पा. पाचोरा), मा. भूपण अहिरे (प्रांताधिकारी, पाचोरा उपविभाग), मा. गणेश पाटील (सभापती, कृ.उ.बा.स. पाचोरा-भडगाव), मा. विजय बनसोडे (तहसीलदार, पाचोरा) तसेच मा. राहुल पवार (पोलीस निरीक्षक, पाचोरा) आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
सदर कार्यक्रमासाठी विविध सामाजिक व मित्र मंडळांचे सहकार्य लाभले असून, शिवसेना, शिवशक्ती-भीमशक्ती जळगाव जिल्हा तसेच सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या वतीने आयोजन करण्यात आले आहे.
तरी पाचोरा व भडगाव तालुक्यातील नागरिकांनी या भव्य कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले.

























