Home पाचोरा पाचोरा नगरपरिषदेकडून थकीत मालमत्ता करावर ‘अभय योजना’३१ मार्चपर्यंत १००% दंडमाफी

पाचोरा नगरपरिषदेकडून थकीत मालमत्ता करावर ‘अभय योजना’३१ मार्चपर्यंत १००% दंडमाफी

पाचोरा नगरपरिषदेकडून थकीत मालमत्ता करावर ‘अभय योजना’; ३१ मार्चपर्यंत १००% दंडमाफी

 

 

पाचोरा (प्रतिनिधी) – पाचोरा नगरपरिषदेकडून थकीत मालमत्ता कर वसुलीसाठी नागरिकांना दिलासा देणारी ‘अभय योजना’ जाहीर करण्यात आली आहे. महाराष्ट्र शासनाच्या नगरविकास विभागाच्या दिनांक ३० मार्च २०२६ च्या शासन निर्णयानुसार ही योजना राबविण्यात येत असून, थकीत करधारकांना दंड व शास्ती रकमेवर मोठी सूट मिळणार आहे.
योजनेनुसार, ज्या मालमत्ता धारकांनी दिनांक ३१ मार्च २०२६ पर्यंत आपला संपूर्ण थकीत मालमत्ता कर एकरकमी भरला, त्यांना १९ मे २०२५ पूर्वीच्या दंड व शास्ती रकमेवर १०० टक्के सूट दिली जाणार आहे. त्यामुळे नागरिकांना थकीत कर भरण्यासाठी ही सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे.
नगरपरिषद प्रशासनाने सर्व नगरसेवक व प्रभाग प्रमुखांना आवाहन केले आहे की, त्यांनी आपल्या प्रभागातील मालमत्ता धारकांना या योजनेची माहिती देऊन कर भरण्यास प्रोत्साहित करावे.
विशेष म्हणजे, ३१ मार्च २०२६ रोजी नगरपरिषद कार्यालय सकाळी ८.०० वाजल्यापासून नागरिकांसाठी खुले राहणार असून, त्या दिवशी कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
अभय योजनेच्या प्रमुख अटी व शर्ती पुढीलप्रमाणे आहेत :
थकीत मालमत्ता कराचा संपूर्ण भरणा ३१ मार्च २०२६ पर्यंत करणे आवश्यक आहे.
कराची एकरकमी रक्कम न भरल्यास योजनेचा लाभ मिळणार नाही.
मूळ मालमत्ता करावर कोणतीही सवलत मिळणार नाही.
मालमत्ता करासोबत पाणीपट्टी कर भरणे बंधनकारक आहे.
विहित नमुन्यात नगरपरिषदेकडे अर्ज करणे आवश्यक आहे.
नगरपरिषदेकडून नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे की, त्यांनी या अभय योजनेचा लाभ घेऊन आपला थकीत कर वेळेत भरावा व दंडमाफीचा फायदा घ्यावा.

Don`t copy text!