Home पाचोरा गोराडखेडा येथे हिंदू मुस्लिम बांधवांतर्फे ईद साजरी 

गोराडखेडा येथे हिंदू मुस्लिम बांधवांतर्फे ईद साजरी 

गोराडखेडा येथे हिंदू मुस्लिम बांधवांतर्फे ईद साजरी

 

पाचोरा तालुका येथे हिंदू मुस्लिम बांधव ऐक्याची आदर्श परंपरा आहे. गावात सर्वच सण व उत्सव सामुदायिक रित्या आदर्श पद्धतीने साजरे केले जातात. हीच परंपरा कायम ठेवत गावातील हिंदू व मुस्लिम बांधवांतर्फे एकत्रित रित्या रमजान ईद हा उत्सव साजरा करण्यात आला. त्यानिमित्त गावातील लोकप्रतिनिधींसह ज्येष्ठ नागरिक व तरुण एकत्र येऊन रमजान ईद पर्वात सहभागी झाले. तसेच मुस्लिम बांधवांना ईद निमित्ताने शुभेच्छा दिल्या. यासह अल्पोपहाराचाही आनंद घेतला. प्रसंगी गोराडखेडा बु, गोरारखेडा खुर्द ग्रामपंचायत लोकप्रतिनिधी, विविध कार्यकारी सोसायटी संचालक मंडळ तसेच गावातील प्रतिष्ठित व ज्येष्ठ नागरिक यासह तरुण मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रसंगी मुस्लिम एकता कमिटीचे पदाधिकारी यांनी उपस्थितांचे स्वागत केले. तसेच हिंदू व मुस्लिम बांधव यांच्यात औनौपचारीक चर्चा करण्यात आली.

Don`t copy text!