वाघोली येथील जोडीचे हनुमान मंदिरा समोरील ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याची ह.भ.प. देविदास महाराज म्हस्के यांच्या काल्याच्या किर्तनाने सांगता

(सुनिल नजन “चिफब्युरो” स्पेशल क्राईम रिपोर्टर अहिल्यानगर जिल्हा)
शेवगाव तालुक्यातील वाघोली येथील जोडीचे हनुमान मंदिरा समोरील अखंड हरिनाम सप्ताहातील ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याची नेवाशाच्या ज्ञानेश्वर मंदिर संस्थानचे प्रमुख ह.भ.प.देविदास महाराज म्हस्के यांच्या काल्याच्या किर्तनाने सांगता झाली.ह.भ.प. सुर्यभान महाराज केसभट यांच्या मार्गदर्शनाखाली आणि वै.रोहिदास महाराज वाघोलीकर यांच्या आशिर्वादाने या अखंड हरिनाम सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या काळात काकडा भजन, विष्णू सहस्त्रनाम, पारायण, प्रवचन,हरीपाठ, हरी किर्तन,जागर या प्रमाणे कार्यक्रम संपन्न झाले.या सप्ताहात सर्व ह.भ.प.अनिल महाराज बर्डे, कारभारी महाराज झरेकर, उद्धव महाराज चन्ने,ज्ञानदास महाराज फड, गणेश महाराज शिंदे, हरीभाऊ महाराज भोंदे, तुकाराम महाराज केसभट यांची किर्तने झाली.शेवटी ग्रंथ मिरवणूकही काढण्यात आली होती.नेवाशाच्या ज्ञानेश्वर संस्थान चे ह.भ.प. देविदास महाराज म्हस्के यांच्या काल्याच्या किर्तनाने या सोहळ्याची सांगता झाली.सप्ताह काळात रावसाहेब वांढेकर यांनी दररोज सकाळी नाष्टा आणि घनःश्याम वांढेकर यांनी जार द्वारे पाणी पुरवठा केला.व्यासपिठ ह.भ.प. बाबासाहेब महाराज मतकर आणि ह.भ.प.शरद महाराज वाघ यांनी चालविले. गायनाचार्य म्हणून कैलास राजगुरू, गोरे महाराज, विष्णू खोसे, जगन्नाथ महाराज खेडकर, कृष्णा महाराज आव्हाड प्रतिक महाराज काळे,मतकर महाराज विद्यार्थी वृंद, प्रदिप महाराज,नवनाथ महाराज आव्हाड, भाऊराव सतरकर,यांनी काम पाहिले तर मृदुंगाचार्य म्हणून विठ्ठल महाराज डोईफोडे यांनी काम पाहिले.या सोहळ्यासाठी समस्थ ग्रामस्थ वाघोली आणि पंचक्रोशीत भाविक व भजनी मंडळ उपस्थित होते.ह.भ.प. देविदास महाराज म्हस्के यांनी उपस्थित श्रोत्यांना चांगलेच मंत्रमुग्ध केले.दर एकादशीला वाघोली गावातील किमान पन्नास भाविक भक्त तरी नेवाशाच्या वारीला आले पाहिजेत अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली. हे भक्त नेवाशाला आले तरच मी आपल्या गावात किर्तनासाठी येईल अशी अटही महाराजांनी घातली आहे.

























