सोयगांव : शासकीय झाडांची अवैध्य सर्रास कत्तल ; अर्थपूर्ण व्यव्हातून वन विभाग निद्रिस्थ कारवाई कोण करणार ?
सोयगांव तालुक्यातील सोयगाव एस टी बसस्थानकाला लागून शासकीय गोडाऊनच्या आवारातील शासकीय वृक्षांची लाकूड माफियांकडून ३५ ते ४० वर्ष वयाच्या दोन पिंपळ व एका निंबाच्या डेरेदार वृक्षांची अवैद्यरित्या व ओविनापरवाना सर्रास तोड करण्यात आली आहे.हा प्रकार गुरूवारी (दी.१९) भर दुपारी शिव जयंतीच्या सुटीचा फायदा घेत घडला.
हा प्रकार सुज्ञ नागरिकांच्या लक्षात येताच विचारपूस करण्यापूर्वीच त्या लाकूड माफियांनी जाय मोक्यावरून पोबारा केला आहे.
या प्रकरणी सूज्ञ नागरिकांतून कारवाई करण्याची मागणी होतआहे.
याप्रकरणी सबंधित वनविभागाचे वनपरिक्षेत्रअधिकारी अनिल मिसाळ.यांना विचारणा केली असता या वृक्षतोडीसाठी कोणतीही परवानगी देण्यात आलेली.नसल्याचे सांगण्यात आले.तसेच महसूल विभागाची देखील वृक्षतोडीलासाठी परवानगी नसल्याचे महसूल सूत्रांनी सांगितले.
वुक्ष तोडीची तक्रार करूनही संबंधित वन विभाग व.महसूल.विभाग कारवाई करत नाही.असे धक्कादायक प्रकार सोयगाव तालुक्यात सध्या सुरु आहे.
सोयगांव तालुक्यातील अवैद्य वृक्ष तोड.माफियांनी शासकीय वृक्षावर लक्ष केंद्रित केले असून खुलेआम डेरेदार वृक्षांची सर्रास तोड.सुरु केली आहे. या वृक्षतोडी मध्ये माफिया ३५ ते ४० वर्ष वयोमान असलेली डेरेदार वृक्षतोड करीत आहेत. यापूर्वी.देखील. सूज्ञ नागरिकांनी बहुलखेडा व कंकराळा ते माळेगांव रस्त्यावरील शासकीय हद्दीतील वृक्षतोड सुरु आहे.अशी तक्रार सोयगांवचे वनक्षेत्रपाल अनिल मिसाळ यांच्या कडे शहर भाजप अध्यक्ष योगेश पाटील यांनी केली होती. मात्र.लाकूड माफियां विरोधात काहीच कारवाई करण्यात आलेली नाही. त्यामुळे वनविभाग व लाकूड माफिया यांचे मधुर अर्थिक संबंध उघडकीस आले आहेत.
चौकट :-
गेल्या महिन्याभरात लाकूड माफियांनी अंदाजे दोन हजार शासकीय वृक्षांची तोड केली असल्याचा अंदाज आहे.एकीकडे शासन दर वर्षी वृक्षसंवर्धन व वृक्षारोपणावर कोट्यवधी रुपये खर्च करीत आहे. तर दुसरी कडे सोयगांव तालुक्यात लाकूड माफीया सर्रास वृक्षतोड करीत आहेत. या लाकूड माफिया विरोधात काही ठोस कारवाई न झाल्यास सोयगांव तालुक्यात रस्त्यावरील वनसंपदा नष्ट होऊन रस्ता वृक्षवीना बोडखा होणार असल्याचे भितीदायक चित्र दिसून येत आहे.
चौकट :-
वन शेत्रपाल चार महिन्यांपासून गायब :-
सोयगाव वन शेत्रपाल कार्यालयाचे क्षेत्रपाल अधिकारी अनिल मिसाळ हे २६ जानेवारी पासून कार्यालयाकडे व वनक्षेत्रात फिरकले नसल्याने लाकूड माफियांना फावले असून अवैध वृक्ष तोडीवर कोणाचेही नियंत्रण नाही.अधिकारीच गैरहजर राहत असल्याने त्यांच्या दालनात नेहमीच टाळे असते.
कोट :- १)
संबधीत वृक्ष तोड विना परवानगी अवैध आहे.आमच्या वन विभगाने त्यास परवानगी दिलेली नाही. याची चौकशी करण्यात येईल.
– अनिल मिसाळ,
वन परिक्षेत्रपाल अधिकारी सोयगाव परिक्षेत्र
कोट : २)
सोयगाव येथील शासनाच्या पुरवठा विभागाच्या जागेवर आता नव्याने नगर पंचायत कार्यालय बांधकाम होणार आहे.त्यासाठी अडसर ठरणाऱ्या वृक्षांची तोड करण्याची परवानगी देण्यात आली होती.मात्र त्यासाठी महसूल व वनविभागाची परवानगी घेण्याची अट सुद्धा संबंधित ठेकेदाराला घालण्यात आली होती.
फोटो ओळ :- सोयगाव – शहरातील जुन्या शासकीय गोडाऊनच्या आवारातील अवैद्यरित्या तोड करण्यात आलेले डेरेदार पिंपळ व निंब वृक्ष
























