Home महाराष्ट्र सोयगाव येथे अंजनाई गोशाळेचा चौथा वर्धापन दिन उत्साहात

सोयगाव येथे अंजनाई गोशाळेचा चौथा वर्धापन दिन उत्साहात

सोयगाव येथे अंजनाई गोशाळेचा चौथा वर्धापन दिन उत्साहात

 

 

 

सोयगाव, दि. १३ : आरोग्यासाठी लाभदायक असलेल्या गोमातेची शाश्वत सेवा केल्यास ती मानवाला शाश्वत अनुभव देते. गोमातेप्रमाणे जगण्याचा संदेश समाजाला घ्यावा. जगाचा पोशिंदा असलेल्या शेतकऱ्यांकडून गोमातेचे महत्त्व कमी झाल्याने निसर्ग आपले खरे रूप दाखवत असल्याचे प्रतिपादन ह.भ.प. योगीराज महाराज कानळदेकर यांनी केले.

ते शुक्रवारी सोयगाव येथे क्रांती जनहित बहुउद्देशीय विकास संस्था संचलित अंजनाई गोशाळेच्या चौथ्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलत होते. कार्यक्रमाच्या प्रारंभी योगीराज महाराज व मान्यवरांच्या हस्ते भगवान श्रीकृष्ण आणि गोमातेचे पूजन करण्यात आले.

योगीराज महाराज पुढे म्हणाले की, गोमातेच्या गोमूत्र व शेणाचा वापर करून सेंद्रिय शेती केल्यास शेतीला मोठा फायदा होतो. गोसेवक व बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी गो तस्करांच्या तावडीतून मुक्त केलेल्या गोमाता अनेकदा गोशाळेत येतात; मात्र त्यांना पूर्वी दिलेल्या इंजेक्शनमुळे त्यांचे आयुष्य कमी होते. त्यामुळे शेतकऱ्यांनी गोमाता विक्रीस न देता थेट गोशाळेत द्याव्यात, असे आवाहन त्यांनी केले.

यावेळी मराठा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष सोपानदादा गव्हाणे यांनी अंत्यविधीसाठी लाकडाऐवजी गोमातेच्या शेणापासून तयार केलेल्या गौऱ्यांचा वापर करण्याचे आवाहन केले. ज्यांना गौऱ्यांची आवश्यकता असेल त्यांना मराठा प्रतिष्ठानकडून मोफत उपलब्ध करून देण्यात येतील, असेही त्यांनी सांगितले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी योगीराज महाराज कानळदेकर होते. प्रमुख पाहुणे म्हणून गटविकास अधिकारी शिवाजी यमुलवाड, पुरवठा विभागाचे नायब तहसीलदार काकासाहेब सावळे, मराठा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष सोपानदादा गव्हाणे, बल्लाळेश्वर फाउंडेशनचे अध्यक्ष हरिभाऊ पाटील, आमखेडा सरपंच नंदा आगे, शिवसेना (उबाठा) तालुकाप्रमुख दिलीप मचे, कुणाल राजपूत, विस्तार अधिकारी दौड, डॉ. केतन काळे, ग्रामसेवक गणेश गवळी, सत्यनारायण पुल्लेवाड, गजानन पवार, भाजपा तालुका उपाध्यक्ष वसंत चव्हाण आदी उपस्थित होते.

प्रास्ताविकात संस्थेचे अध्यक्ष संदीप इंगळे यांनी गोशाळेच्या स्थापनेपासून आजपर्यंतच्या कामाचा आढावा घेतला. चार वर्षांत गोशाळेत ९० गोवंश दाखल झाल्याची माहिती त्यांनी दिली.

यावेळी संस्थेचे सचिव दिलीप शिंदे, सदस्य ज्ञानेश्वर गाडेकर, अशोक ढगे, अनिल लोखंडे, कोषाध्यक्ष सौ. उर्मिला इंगळे, सौ. रुपाली लोखंडे, सौ. मिनाबाई गाडेकर, सौ. पद्माबाई शिंदे यांच्यासह समाधान खैरनार, अरुण आहेर, दिलीप रहाटे, ज्ञानेश्वर बडक, सागर इंगळे, भगवान दणके, पवन आगे, रमेश शिंदे, तसेच गोशाळा कर्मचारी ज्ञानेश्वर जाधव, अनिल ठाकरे, राहुल सोनवणे, शिवाजी फरकाडे, विष्णू तिडके, केतन शिंदे, अथर्व इंगळे, मयूर शिंदे, प्रशांत घनगाव, अनिल निकुंभ आणि परिसरातील गोप्रेमींनी कार्यक्रमाच्या आयोजनासाठी परिश्रम घेतले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार संस्थेचे अध्यक्ष संदीप इंगळे यांनी मानले.

Don`t copy text!