Home महाराष्ट्र तालुक्यातून प्रथम क्रमांक मिळवत क्रांती गावडेची इस्रो सहलीसाठी निवड

तालुक्यातून प्रथम क्रमांक मिळवत क्रांती गावडेची इस्रो सहलीसाठी निवड

तालुक्यातून प्रथम क्रमांक मिळवत क्रांती गावडेची इस्रो सहलीसाठी निवड

 

 

सोयगाव प्रतिनिधी दत्तात्रय काटोले

सोयगाव : जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा सोयगाव येथील इयत्ता पाचवीची विद्यार्थिनी कु. क्रांती निलेश गावडे हिने जिल्हास्तरीय इस्रो सहल निवड परीक्षेत सोयगाव तालुक्यात प्रथम क्रमांक मिळवत उल्लेखनीय यश संपादन केले आहे. तिची इस्रो सहलीसाठी निवड झाली असून तालुक्याच्या शैक्षणिक क्षेत्रात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

कु. क्रांती गावडे हिने यापूर्वीही विविध स्पर्धांमध्ये उल्लेखनीय कामगिरी केली आहे. जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत तिने प्रथम क्रमांक मिळवला असून सैनिकी स्कूल सातारा निवड परीक्षेतही उत्कृष्ट गुण मिळवत ती निवड झाली आहे.

या यशाबद्दल कु. क्रांती गावडे व तिचे मार्गदर्शक वर्गशिक्षक तसेच मुख्याध्यापक किरणकुमार पाटील यांचे सर्व स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे. जिल्हा परिषद सदस्या पुष्पा काळे, नगराध्यक्षा आशाबी तडवी, उपनगराध्यक्षा सुरेखा काळे, पंचायत समिती सदस्या जयश्री पवार, सविता गव्हाडे, गटशिक्षणाधिकारी सचिन शिंदे, शिक्षण विस्तार अधिकारी सचिन पाटील, सोयगाव केंद्र प्रमुख फिरोज तडवी यांच्यासह भागवत गायकवाड, रविंद्र काळे, हर्षल काळे, राजेंद्र दुतोंडे, अण्णा वाघ, रघुनाथ लोखंडे तसेच तालुक्यातील शिक्षक संघटनांनी तिचे कौतुक केले आहे.

तसेच शाळेतील शिक्षक सुरेखा चौधरी, पंकज रगडे, रामचंद्र महाकाळ, मंगला बोरसे, सविता पाटील, गणेश बाविस्कर, अकुश काळे, प्रतिभा कोळी, नंदा म्हस्के, पांडुरंग बारगजे, विखार शेख, बिलाल बागवान, विवेक महाजन, अनिल देसाई, तानाजी चव्हाण, शुभम देसले व पूनम लाड यांनीही क्रांतीचे अभिनंदन केले आहे.

Don`t copy text!