श्री.गो.से.हायस्कूल मध्ये नॅशनॅलिटी व डोमिसाईल प्रमाणपत्र वितरण संपन्न
पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्था संचलित श्री.गो.से. हायस्कूल मध्ये विद्यार्थ्यांना नॅशनॅलिटी व डोमिसाईल सर्टिफिकेट तहसीलदार मा. श्री. विजय बनसोडे साहेब यांच्या हस्ते वितरित करण्यात आले. याप्रसंगी शालेय समिती चेअरमन मा.दादासो.श्री.खलील देशमुख, स्टेट बँक ऑफ इंडिया चे मॅनेजर श्री.प्रदीप जाधव साहेब, उप मुख्याध्यापक श्री. आर.एल.पाटील सर , पर्यवेक्षिका सौ.ए.आर.गोहिल मॅडम, पर्यवेक्षक श्री.आर.बी. तडवी सर ,श्री.आर.बी.बांठिया सर , किमान कौशल्य प्रमुख मनीष बाविस्कर सर, कार्यालय प्रमुख श्री अजय सिनकर, सांस्कृतिक विभाग प्रमुख श्री.एम.टी. कौंडिण्य सर , क्रीडा प्रमुख श्री.एस.पी. करंदे सर, धनलक्ष्मी ई सर्व्हिसेस चे संचालक श्री.विकास सोनगिरे, शिक्षक बंधू भगिनी व विद्यार्थी उपस्थित होते.
विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणासाठी हे दस्तऐवज शाळेने उपलब्ध करून दिल्याबद्दल दादासो.श्री.खलील देशमुख यांनी कौतुक केले.
तहसीलदार मा.श्री.विजय बनसोडे साहेब यांनी विद्यार्थ्यांमध्ये नैतिक मूल्यांची रुजवणूक होणे आवश्यक असल्याचे विविध उदाहरणांनी स्पष्ट केले व विद्यार्थ्यांना परीक्षा व भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्यात.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. आर.बी.बोरसे सर यांनी तर आभार श्री.बी.एस.पाटील सर यांनी व्यक्त केले.
























