जवखेडे दुमाला येथे अखंड हरिनाम सप्ताहात ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याची ज्ञानेश्वर माउली कराळे यांच्या काल्याच्या किर्तनाने सांगता

(सुनिल नजन “चिफब्युरो” स्पेशल क्राईम रिपोर्टर अहिल्यानगर जिल्हा)
जवखेडे दुमाला तालुका पाथर्डी, जिल्हा अहिल्यानगर येथील अखंड हरिनाम सप्ताहातील ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याची ह.भ.प.ज्ञानेश्वर माउली कराळे यांच्या काल्याच्या किर्तनाने सांगता झाली.दिनांक २२ फेब्रुवारी ते १मार्च या कालावधीत हा अखंड हरिनाम सप्ताह साजरा करण्यात आला.या काळात दररोज पहाटे काकडा भजन, सकाळी ज्ञानेश्वरी पारायण, दुपारी प्रवचन, सायंकाळी हरीपाठ,रात्री ७ते९ हरीकिर्तन आणि मग भोजना नंतर हरी जागर या प्रमाणे कार्यक्रम संपन्न झाले.सर्व ह.भ.प. सचिन महाराज पवार,हंसराज महाराज मगर, शंकर महाराज भागवत,निलेश महाराज वाणी, हनुमंत महाराज, उद्धव महाराज चन्ने,सुधाकर महाराज वाघ,यांची किर्तने झाली.शेवटी दिंडी प्रदक्षिणा पूर्ण होऊन रविवार दिनांक १ मार्च रोजी सकाळी दहा ते बारा या वेळेत करंजी घाटातील ह.भ.प. महंत ज्ञानेश्वर माउली कराळे यांच्या काल्याच्या किर्तनाने आणि मोहन रामु नेहुल यांच्या महा प्रसादाच्या पंगतीने या सोहळ्याची सांगता झाली. ह.भ.प. ज्ञानेश्वर माउली कराळे यांनी आपल्या किर्तनात सांगितले की काल्याचा घास खाण्यासाठी देवाचा पाठलाग करावा लागतो. आपले हात हे इतरांच्या मुखात घालण्या साठीच देवाने दिले आहेत.आपले हात नेहमी मोकळे ठेवत जा.जे आपणास मिळाले आहे ते दुसऱ्यास वाटल्याने भरवशाने पांडुरंग भेटेल.देवाने एक जरी घास दिला तरी आयुष्य भर पुरतो.परमात्मा भेटणं सोपे नाही.सतत ध्यास धरावा लागतो.पुंण्य, प्रार्थना,आणि प्रयत्न हे तत्त्व माणसाने अंगिकारले पाहिजे.प्रयत्नांचा जेव्हा शेवट होतो तेव्हा प्रार्थनेचा जन्म होतो.प्रसंन्न होउन जे दिले जाते त्याला प्रसाद म्हणतात. एखाद्याचा उद्धार करायचा असला तर देव त्याला गरीबच ठेवतो.देवाचा प्रसाद मिळवण्या साठी भाग्य लागते.कृष्णाने गोपिकांना रस रूपी आनंद दिला.रास म्हणजे रमवनारा होय.देव अंतरात आणा म्हणजे सुख भरपूर मिळते.पोटी भुक सुकले मुख,चोरटे सुख खेळायाचे असे
अनेक दाखले देत ज्ञानेश्वर कराळे माउली यांनी उपस्थित श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले.यावेळी जवखेडे दुमाला गावातील सर्व ग्रामस्थ,तरुण मंडळ,भजनी मंडळ,आणि पारायण सप्ताह कमेटीने या सोहळ्या साठी विषेश सहकार्य केले.म्हणून महाराजांनी सर्व माता, भगिनी,लहान थोर,अबाल वृध्द यांचे कौतुक केले. वृद्धेश्वर वारकरी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष बाबासाहेब मतकर आणि त्यांचे विद्यार्थी यांनी सप्ताह काळात चांगले सहकार्य केले. यावेळी पंचक्रोशीतील अनेक भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.या सप्ताह काळात नेहुल, चव्हाण,मुजमुले, काकडे,कर्पे,या परीवाराच्या वतीने अन्नदान करण्यात आले.






















