Home पाचोरा डॉ.अंजली पाटील यांची गगन भरारी

डॉ.अंजली पाटील यांची गगन भरारी

डॉ.अंजली पाटील यांची गगन भरारी

 

 

 

पाचोरा-डॉ.अंजली नरेंद्र पाटील यांनी एम.एस. नीट प्रवेश परीक्षा उत्तीर्ण करत गगन भरारी घेतली असून एम.एस.स्त्री रोग तज्ञ(M.S.Obstetrics,& Gynecology)साठी तेरणा मेडिकल कॉलेज,नेरूळ,मुंबई या ठिकाणी प्रवेश घेतलेला आहे.

पाचोरा शहरातील श्री.गो.से.हायस्कूलचे मुख्याध्यापक श्री.एन.आर.पाटील (ठाकरे) आणि उपशिक्षिका सौ.ज्योती नरेंद्र पाटील (ठाकरे) यांच्या कन्या असून त्यांनी यापूर्वी एमबीबीएस पदवी संपादन केली होती. मागील वर्षांपासून त्या पिंपळगाव हरेश्वर ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकारी सेवेत आहेत.

त्यांच्या या यशाबद्दल पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष आणि माजी आमदार दिलीपभाऊ वाघ,चेअरमन संजय वाघ, मानद सचिव. ॲड.महेश देशमुख, व्हॉइस चेअरमन व्ही. टी.जोशी, शालेय समितीचे चेअरमन खलील देशमुख,तांत्रिक विभागाचे चेअरमन वासुदेव महाजन यांचेसह शहरातील सर्व शैक्षणिक,सामाजिक आणि वैद्यकीय क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

Don`t copy text!