Home महाराष्ट्र सोयगाव तालुक्यात भाजपचा वरचष्मा; तीनपैकी दोन गटांवर भाजपची पकड, उबाठाचा एक गट...

सोयगाव तालुक्यात भाजपचा वरचष्मा; तीनपैकी दोन गटांवर भाजपची पकड, उबाठाचा एक गट कायम

सोयगाव तालुक्यात भाजपचा वरचष्मा; तीनपैकी दोन गटांवर भाजपची पकड, उबाठाचा एक गट कायम

 

 

 

सोयगाव | प्रतिनिधी : दत्तात्रय काटोले

सोयगाव तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या तीन गटांसाठी झालेल्या निवडणुकांचे निकाल सोमवारी (दि. ९) जाहीर झाले. निवडणूक निर्णय अधिकारी रुपेश शिनगारे व सहाय्यक अधिकारी मनीषा मेने (जोगदंड) यांनी अधिकृतरीत्या निकाल घोषित केला.

या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने दोन जिल्हा परिषद गट व पंचायत समितीच्या तीन गणांवर विजय मिळवत तालुक्यात आपला वरचष्मा प्रस्थापित केला आहे. तर गोंदेगाव जिल्हा परिषद गटावर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाने आपली परंपरागत पकड कायम राखली आहे.

तालुक्यातील फर्दापूर व आमखेडा जिल्हा परिषद गटांत भाजपने दणदणीत विजय मिळवला, तर गोंदेगाव गटात शिवसेना (उबाठा) यशस्वी ठरली.

पंचायत समितीच्या गणांमध्ये फर्दापूर, सावळदबारा व आमखेडा येथे भाजपचे उमेदवार विजयी झाले, तर निंबायती व गोंदेगाव गणात शिवसेनेने, आणि बनोटी गणात शिवसेना (उबाठा) गटाने बाजी मारली.

मागील निवडणुकीत माजी मंत्री अब्दुल सत्तार यांच्या नेतृत्वाखाली फर्दापूर व गोंदेगाव गटांसह पंचायत समितीवर सत्ता होती. मात्र यावेळी माजी खासदार रावसाहेब दानवे यांच्या नेतृत्वाखाली भाजपने फर्दापूर व आमखेडा हे दोन जिल्हा परिषद गट तसेच पंचायत समितीतील अतिरिक्त जागांवर विजय मिळवत आपले वर्चस्व अधिक भक्कम केले आहे.

जिल्हा परिषद निकाल

फर्दापूर गट :

भाजपचे माहीन इद्रिस मुलतानी (१३,८३७) यांनी शिवसेनेच्या प्रभावती चव्हाण दारासिंग (९,९९६) यांचा ४,७३१ मतांनी पराभव केला.

आमखेडा गट :

भाजपच्या पुष्पा प्रकाश काळे (१०,८७१) यांनी शिवसेनेच्या मोनाली पवार (७,६०६) यांचा ३,२६५ मतांनी पराभव केला.

गोंदेगाव गट :

शिवसेना (उबाठा) च्या चव्हाण सुनीता चंद्रशेखर (६,८२६) यांनी शिवसेनेच्या पूजा वाघ (६,१८१) यांचा ६४५ मतांनी पराभव केला.

पंचायत समिती निकाल

फर्दापूर गण : भाजपचे राहुल अंकुश राठोड (६,३९३) – २,२६५ मतांची आघाडी

सावळदबारा गण : भाजपचे उत्तम महारू चव्हाण (६,५७३) – २,२४२ मतांची आघाडी

आमखेडा गण : भाजपच्या जयश्री गजानन पवार (५,२६९) – १,९०६ मतांची आघाडी

निंबायती गण : शिवसेनेच्या सविता सोपान गव्हांडे (५,११०) – १,४८८ मतांची आघाडी

गोंदेगाव गण : शिवसेनेच्या गयाबाई गोविंदा घोडे (३,७९८) – ९६० मतांची आघाडी

बनोटी गण : शिवसेना (उबाठा) चे वैभव सागर पाटील (३,०३८) – ४४१ मतांची आघाडी.

Don`t copy text!