शिक्षिका विद्या जोशी यांची राज्यस्तरावर निवड

शिक्षिका विद्या जोशी यांची राज्यस्तरावर निवड

 

 

राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद (एस सी ई आर टी ) यांच्यावतीने शिक्षक ,कर्मचारी व अधिकारी यांच्यासाठी यंदा प्रथमच आयोजित करण्यात आलेल्या क्रीडा स्पर्धांमध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नांद्रा . तालुका पाचोरा जिल्हा जळगाव येथील उपशिक्षिका सौ विद्या सचिन जोशी यांची राज्यपातळीवर निवड झाली आहे. त्यांच्या या यशामुळे संपूर्ण जिल्ह्यात शैक्षणिक क्षेत्रात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून हे यश अत्यंत अभिमानास्पद मानले जात आहे.

सध्या राज्यभर शिक्षक कर्मचारी तसेच अधिकाऱ्यांच्या शैक्षणिक , क्रीडा ,सांस्कृतिक व बौद्धिक क्षमतेला चालना देण्यासाठी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात येत आहे त्याचाच एक भाग म्हणून महाराष्ट्र शासनाच्या महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद यांच्या चमाध्यमातून यंदा प्रथमच क्रीडा स्पर्धा राबविण्यात आल्या यातील 100 मीटर धावणे या प्रकारात धुळे येथे पार पडलेल्या विभागीय स्पर्धेत विद्या सचिन जोशी यांनी यश संपादन करत राज्य स्पर्धेसाठी पात्र ठरल्या आहेत. जिद्द चिकाटी व मेहनत यांच्या बळावर तालुका ते राज्यस्तरावर सौ विद्या जोशी यांनी मजल मारल्याने त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे. यापूर्वी देखील विद्या जोशी यांनी कॉफी विथ सीईओ या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल कर्नल मॅडम यांच्या संकल्पनेतील या महत्त्वकांक्षी उपक्रमात सहभाग घेतला होता. विनोबा ॲप तर्फे उत्कृष्ट शिक्षक म्हणून देखील त्यांची निवड झाली आहे व जिल्हाधिकारी श्री रोहन घुगे साहेब यांनी देखील त्यांचा सत्कार केला आहे. विविध शैक्षणिक उपक्रम शैक्षणिक साहित्य स्पर्धा विद्यार्थ्यांसाठी विविध स्पर्धा यात त्यांचे उल्लेखनीय कार्य आहे.

त्यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल पाचोर्‍याचे कार्यसम्राट आमदार श्री किशोर आप्पा पाटील यांनी त्यांचा सत्कार व अभिनंदन केले आहे. तसेच तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी श्री विजय पवारसाहेब. शिक्षण विस्ताराधिकारी समाधान पाटील साहेब ,शिक्षण विस्तार अधिकारी सरोज गायकवाड मॅडम, डायट प्राचार्य श्री अनिल झोपे साहेब, मुख्याध्यापक जिल्हा परिषद शाळा नांद्रा तसेच शाळा व्यवस्थापन समिती नांद्रा व ग्रामपंचायत नांद्रा यांनी अभिनंदन केले आहे.